Narendra Modi in Pune sakal
लोकसभा २०२४

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

डोक्यावर भगव्या टोप्या, फेटा, खांद्यावर भगवा झेंडा अन् गळ्यात उपरणे यामुळे रेसकोर्सचे मैदान भगवेमय झाले होते, याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत ‘यहाँ केसरिया सागर लहरा रहा हैं’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : डोक्यावर भगव्या टोप्या, फेटा, खांद्यावर भगवा झेंडा अन् गळ्यात उपरणे यामुळे रेसकोर्सचे मैदान भगवेमय झाले होते, याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत ‘यहाँ केसरिया सागर लहरा रहा हैं’, अशी दाद दिली. भाषणामध्ये मराठीतून पुणेकरांचे धन्यवाद देतानाच ‘पुणे तेथे, काय उणे’ अशी केलेली कोटी, राहुल गांधींचा शहजादे उल्लेख करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ‘अब की बार ४०० पार’, ‘मोदी... मोदी... मोदी...’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याने मोदींनी सभेचे मैदान मारले.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी पुण्यासह बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील ग्रामीण भागातून नागरिक उपस्थित होते. सभा सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू होणार होती, त्यामुळे दुपारी चारपासून लोक सभास्थळी जमू लागले होते. पण उन्हाचा चटका आणि उकाड्याने कार्यकर्त्यांचे हाल झाले. रेसकोर्सच्या मैदानात सावली नसल्याने ऊन कमी होईपर्यंत परिसरातील रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या सावलीत विसावा घेतला. सायंकाळी पाचनंतर सभेच्या ठिकाणी तरुण, ज्येष्ठ कार्यकर्ते व महिलांची पावले वळू लागली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, व्हीआयपी पासवर आतमध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू होती. सभेच्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची व्यवस्था केली होती.

पावणेसातच्या सुमारास मोदींचे व्यासपीठावर आगमन होताच ‘मोदी... मोदी... मोदी... मोदी...’ अशा उत्स्फूर्त घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोदींनी नमस्कार करताच शिट्ट्या, टाळ्यांनी जल्लोष झाला. भाषणाला सुरुवात करताना मोदींनी ‘मला येथे केसरिया (भगवा) सागर उसळलेला दिसत आहे’ असे सांगितले. यावेळी माईकमध्ये ‘इको’ येत असल्याने आवाज घुमत होता. त्यामुळे मोदींनी भाषण थांबवत ‘इको’ बंद करा, देशातील १४० कोटी जनताच माझी ‘इको’ आहे असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मोदींच्या ४९ मिनिटांच्या भाषणात ‘शहजादे’चा मुद्दा उपस्थित करताच कार्यकर्त्यांनी त्यास घोषणा देऊन प्रतिसाद दिला.

‘माझा जय श्रीराम सांगा’

सभा संपल्यानंतर जेव्हा तुम्ही घरोघरी प्रचाराला जाल, तेव्हा प्रत्येकाला माझा ‘जय श्रीराम’ सांगा, असे आवाहन मोदींनी केले. दरम्यान रेसकोर्सच्या मैदानावर सुमारे १ लाख नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. समोरच्या भागात तुडुंब गर्दी असली तरी पाठीमागच्या अनेक रांगा रिकाम्या होत्या. त्याचा व्हिडिओ विरोधकांनी सोशल मीडियावरून व्हायरल केला.

लहान मुलांनी वेधले लक्ष

सभेला मुले मोदी यांचे फोटो घेऊन बराच वेळ उभी होती. मोदी यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती, तेव्हा त्यांनी इशारा करून खाली बसण्यास सांगितले, तरीही ही मुले उभीच राहिल्याने भाषणाला सुरुवात करताच मोदी यांनी ‘मी तुम्हाला बघितले आहे, तुम्ही खूप वेळेपासून उभे आहात, तुम्ही खाली बसा’ असे आवाहन केले.

घर मिळाल्याने दिव्यांग आजी सभेला

सोलापूर रस्त्यावरून जवळपास एक किलोमीटर आतमध्ये नागरिकांना चालत सभेच्या ठिकाणी जावे लागत होते. यामध्ये दिव्यांग असलेल्या जनाबाई कांबळे या आजी मार्केट यार्ड परिसरातून आल्या होत्या. मला मोदींजीमुळे घर मिळाले आहे, त्यामुळे धन्यवाद देण्यासाठी मी सभेला आले होते, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivali News : डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजकारण तापले! 'डोंबिवलीचा रवी कुठे?' राजू पाटील यांचा रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल

MHA New Guidelines: राष्ट्रगीत गायनासंदर्भात नवीन नियमावली; केंद्रीय गृहमंत्रालयाचे नवे आदेश

Uruli Kanchan Crime : पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बळजबरीने अत्याचार; उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांना शिवीगाळ, कागद भिरकावत वकिलाचे न्यायमूर्तींनाच आदेश; सुनावणीवेळी हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL

Satana News : सटाण्यात घरपट्टीत ऐतिहासिक ५० टक्के कपात; ९०१ प्रलंबित व नव्या मालमत्तांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT