lok sabha election 2024
lok sabha election 2024 esakal
लोकसभा २०२४

Nashik Lok Sabha Election : मोदी लाटेने मोडली परंपरा..!

विक्रांत मते

Nashik Lok Sabha Election : एकदा निवडून दिलेला खासदार नाशिक लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडून येत नसल्याची परंपरा मोदी लाटेने सन २०१९ मध्ये मोडीत काढली. विद्यमान खासदार हेमंत गोडसे सलग दोनदा निवडून आल्यानंतर त्यांना नशीबवान समजले गेले. उर्वरित लोकसभेच्या निवडणुकीत एकेरी विजय खासदारांना मिळत गेले. (Nashik Modi wave broke tradition of not being re elected in Lok Sabha constituency marathi news)

पक्षनिहाय विचार करता कॉंग्रेसला आठ विजय मिळाले त्याखालोखाल शिवसेनेला चार तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोनदा विजय मिळाला आहे. भाजप व भारतीय लोकदलाला एक विजय मिळाला. सन १९६७ मध्ये भानुदास कवडे यांनी सलग दोन विजय मिळविले. लहरी मतदारसंघ असलेल्या नाशिकवर एकाही व्यक्तीला कायमस्वरुपी पकड बसविता आली नाही.

तसे दमदार नेतृत्व न मिळाल्याने सातत्याने कधी आश्‍वासने तर कधी लाटेवर हा मतदारसंघ स्वार झाला आहे. त्यामुळे सलग चार ते पाच वेळा निवडून येण्याचे विक्रम नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कधी झाले नाहीत. दोनदा विजय मिळाल्याने विद्यमान खासदार गोडसे यांना नशीबवान समजले जाते. त्यांच्या विजयामागे मोदी करिश्‍मा महत्वाचा ठरला.

कॉंग्रेसचा प्रभाव कमी

सन १९९१ पर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा प्रभाव होता. परंतू हा प्रभाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर कमी झाला. समाजवादी विचारसरणीच्या या मतदारसंघात हिंदूत्वाला देखील प्राधान्य दिले गेले. १९८९ मध्ये जनसंघाचे भाजपमध्ये परावर्तित झालेल्या पक्षाला नाशिककरांनी मतदान केले. डॉ. वसंत पवार कॉंग्रेसचे शेवटचे खासदार ठरले. १९९६ नंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात आलटून पालटून राष्ट्रवादी व शिवसेनेने पकड ठेवली आहे. (latest marathi news)

निवडणुक वर्ष विजयी उमेदवार पक्ष

२०१९ हेमंत गोडसे शिवसेना

२०१४ हेमंत गोडसे शिवसेना

२००९ समीर भुजबळ राष्ट्रवादी कॉंग्रेस

२००४ देविदास पिंगळे राष्ट्रवादी कॉंग्रेस

१९९९ उत्तम ढिकले शिवसेना

१९९८ माधव पाटील कॉंग्रेस

१९९६ राजाराम गोडसे शिवसेना

१९९१ वसंत पवार कॉंग्रेस

१९८९ दौलत आहेर भाजप

१९८४ मुरलीधर माने कॉंग्रेस

१९८० प्रताप वाघ कॉंग्रेस (आय)

१९७७ विठ्ठलराव हांडे बीएलडी

१९७१ भानुदास कवडे कॉंग्रेस

१९६७ भानुदास कवडे कॉंग्रेस

१९६३ यशवंतराव चव्हाण कॉंग्रेस

१९६२ गोविंद हरी देशपांडे कॉंग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT