Nitin Gadkari esakal
लोकसभा २०२४

Nitin Gadkari: नितीन गडकरींपेक्षा त्यांची पत्नी तिप्पट श्रीमंत, मुंबईत 2 घरांची मालकीण! एकूण मालमत्ता जाणून घ्या...

Nitin Gadkari: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांची मालमत्ता देखील व्हायरल होत आहे. नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांची संपत्ती किती आहे हे जाणून घेऊया.

Sandip Kapde

Nitin Gadkari: भाजपने नागपूर लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना तिकीट दिले आहे. गेली दोन टर्म ते खासदार आहेत. गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचाराला देखील जोरदार सुरुवात केली आहे. त्यांच्या अर्जानुसार त्यांची पत्नी कांचन गडकरी जास्त श्रीमंत आहेत. नितीन गडकरी आणि त्यांच्या परिवाराजवळ २८ करोड रुपयांची संपत्ती आहे.

नितीन गडकरी यांच्या उमेदवारी अर्जानुसार २०२२-२३ मध्ये त्यांची कमाई १३ लाख ८४ हजार रुपये होती. तर त्यांच्या पत्नींची वार्षिक कमाई ४० लाख ६२ हजार होती. नितीन गडकरी यांच्याजवळ १२,३०० रुपये कॅश आणि त्यांची पत्नीजवळ १४ हजार ७५० रुपये कॅश आहेत.

उमेदवारी अर्जानुसार नितीन गडकरी यांच्याजवळ २१ बँक खाती आहेत. यामध्ये ४९ लाख ६ हजार रुपये आहेत.तर त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या बँक खात्यात १६ लाख ३ हजार रुपये जमा आहेत.

नितीन गडकरी यांनी शेअर्स आणि म्युच्युअल फंडातही गुंतवणूक केली आहे. त्यात त्यांनी ३५ लाख ५५ हजार रुपये तर पत्नीने २० लाख ५१ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. नितीन गडकरी आणि त्यांची पत्नी या दोघांच्या नावावर तीन आलिशान गाड्या आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे ॲम्बेसेडर कार, होंडा आणि इसुझू डी मॅक्स आहे, तर त्यांच्या पत्नीकडे इनोव्हा, महिंद्रा आणि टाटा इंट्रा कार आहे.

गडकरी यांच्याकडे ४८६ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. त्याची किमंत सुमारे ३१ लाख ८८ हजार रुपये आहेत. तर त्यांची पत्नी कांचन गडकरी यांच्याकडे ३६८ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. याची किमंत २४ लाख १३ हजार रुपये आहे.

गडकरी यांच्याकडे सोन्याचे वडिलोपार्जित दागिने देखील आहेत. त्याची किंमत सुमारे ३१ लाख १० हजार रुपये आहे. अशा स्थितीत नितीन गडकरी यांच्या जंगम मालमत्तेवर नजर टाकली तर ती ३ कोटी ५३ लाख रुपये आहे.

जमीन किती आहे?

नितीन गडकरी यांच्याजवळ १५.७४ एक्कर जमीन आहे. याची किमंत १ करोड ५७ लाख रुपये आहे. तर त्यांच्या परिवाराजवळ १४.६ एक्कर शेती आहे. याची किमंत १ करोड ७९ लाख रुपये आहे. नागपूर आणि मुंबई मध्ये गडकरी यांच्याजवळ ७ घरे आहेत. मुंबईतही दोन इमारती आहेत ज्यांची किंमत ४ कोटी ७५ लाख रुपये आहे. गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे एकूण २४ कोटी ४९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT