Ambadas Danve esakal
लोकसभा २०२४

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

छत्रपती संभाजी नगरच्या गुन्हे शाखेने आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : ईव्हीएम हॅक करून लागेल तितकं मतदान करून देतो, अशी बतावणी करुन त्याबदल्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडं दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईव्हीएम हॅक करण्याची गोष्ट करणाऱ्या या व्यक्तीला छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे. यासाठी अंबादास दानवे यांच्या भावानं सापळा रचून आरोपीला पकडवून दिलं. (One and a half crore rupees demanded to Ambadas Danve for hack EVM caught him red handed)

नेमका प्रकार काय?

आरोपी मारोती ढाकणे हा लष्करातील जवान आहे, सध्या तो जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्तीवर आहे. गेल्या काही दिवसांपासून तो अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यानं छ्त्रपती संभाजीनगर इथली सर्व ईव्हीएम हॅक करुन तुम्हाला हवा तसा निकाल देतो असं फोन करुन सांगितलं. सुट्टीवर आल्यापासून तो गेल्या काही दिवसांपासून आपल्याला फोन करुन ईव्हीएम हॅक करुन देतो, त्या बदल्यात मला पैसे हवेत अशी मागणी करत होता, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

सापळा रचून घेतलं ताब्यात

या प्रकरात दानवे यांना संशय आल्यानंतर त्यांनी आपल्या भावाकडून त्याला पैसे देतो असं सांगून पोलिसांच्या मदतीनं सापळा रचला. त्यानंतर एक लाख रुपये देण्यासाठी त्याच्या भेटीला एका हॉटेलमध्ये गेले असता सोबत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

कर्जबाजारी असल्यानं आपल्याला ही कल्पना सुचली त्यासाठी आपण हा प्रयत्न केल्याचं या आरोपीनं पोलिसांना सांगितलं. पण विशेष म्हणजे त्याच्याकडं या कामासाठी काही आक्षेपार्ह गोष्टी देखील आढळून आल्या आहेत. त्यामुळं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून चौकशी करण्यात येत आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रेकिंग! उजनी धरणाचे सर्व दरवाजे बंद; भीमा नदीतील विसर्ग पूर्णपणे थांबविला; आषाढी वारीत वाळवंटात नसणार पाणी

Shubman Gill Century: शतक एक विक्रम अनेक! कर्णधार गिल दिग्गजांच्या पंक्तीत; ब्रॅडमनसह, विराट, गावसकरांचीही बरोबरी

Viral Video: हेलिकॉप्टरमधून चक्क नोटांचा पाऊस... महाराष्टातील लोक म्हणाले अरे, आमच्या सोलापूरात पाडा!, कोणी तर थेट लोकेशन विचारलं

Gevrai Police : गेवराईचे चकलांबा पोलीस अ‍ॅक्शन मोडववर; २७ लाख ३ हजारांची वाळू व यंत्रसामग्री जप्त

Stock Market Opening: विकली एक्सपायरी दिवशी बाजार तेजीत; सेन्सेक्स 200 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

SCROLL FOR NEXT