Narendra Modi sakal
लोकसभा २०२४

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

‘‘विरोधकांनी सिंचन योजना रखडवून महाराष्ट्राला धोका दिला. शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून पाठवलेला पैसा ‘पंजा’ गावागावांत लुटत होता. काँग्रेसपासून सावध राहा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी माळशिरस येथे केले.

सकाळ वृत्तसेवा

लातूर/धाराशिव/माळशिरस : ‘‘विरोधकांनी सिंचन योजना रखडवून महाराष्ट्राला धोका दिला. शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून पाठवलेला पैसा ‘पंजा’ गावागावांत लुटत होता. काँग्रेसपासून सावध राहा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी माळशिरस येथे केले. उस्मानाबाद (धाराशिव) आणि लातूर येथेही त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. लातूर आत्मनिर्भर भारता`चे हब बनत चालले आहे, असे कौतुक करीत आघाडी सरकारने रोखलेल्या मराठवाडा वॉटरग्रीड, जलयुक्त शिवार या योजनांना राज्य सरकार गती देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महायुतीच्या पाठीशी उभे राहा

माळशिरस : ‘‘आपल्या मुलाबाळांसाठी कष्टाने कमावून बचत केलेल्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे. आपल्या मेहनतीचा हिस्सा लुटण्याचा विचार करणारे धोकादायक आहेत.त्यासाठी काँग्रेसपासून सावध राहा. मजबूत भारत व मजबूत सरकारसाठी महायुतीच्या पाठीशी उभे राहा,’’ असे आवाहन मोदी यांनी केले. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सिंचन, सहकार, शेती क्षेत्राकडे केलेल्या दुर्लक्षाप्रश्नी त्यांनी विरोधकांवर टीका केली.

हा केवळ ट्रेलर आहे

धाराशिव : आमच्या सरकारने विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केली असून, हा केवळ ट्रेलर आहे. ही निवडणूक शक्तिशाली, विकसित भारतासाठी असून साथ देण्याचे आवाहन मोदी यांनी केले. विश्वासघात हीच काँग्रेसची ओळख असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. उस्मानाबाद मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

घरात घुसून मारण्याची भारतात ताकद

लातूर : ‘‘शैक्षणिक क्षेत्रात लातूरचे नाव गाजवणाऱ्या लातूरकरांना नमस्कार. आई तुळजाभवानी, सिद्धेश्वर महाराजांना श्रद्धापूर्वक नमस्कार,’’ असे म्हणत मोदींनी मराठीतून भाषणाची सुरवात केली. लोकसभेच्या लातूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ आज झालेल्या सभेत ते बोलत होते.काँग्रेस, ‘इंडिया’ आघाडीवर त्यांनी टीकास्त्र सोडले. मी ‘एक भारत’ची चर्चा करीत असताना काँग्रेस मात्र भारताकडे विभागून पाहत आहे. दरवर्षी एक पंतप्रधान देण्याचा त्यांचा मनसुबा आहे.

काँग्रेसने देशाला लुटण्याची योजना तयार केली आहे, असे ते म्हणाले. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना उद्देशून बोलताना मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या काळात मुंबई, दिल्लीत बॉम्बस्फोट व्हायचे. त्यावेळी घटनेची केवळ फाइल पाठवली जात असे. पुढे कारवाई काहीच होत नसे. मोदी आल्यानंतर मात्र घरात घुसून मारतो हे दाखवून दिले. ‘मिशन एलओसी’, पाकिस्तानमधील ‘सर्जिकल स्ट्राईक’ ही त्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आज देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नाही. आज घरात घुसून मारण्याची ताकद आता भारतात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidri Sugar Factory : शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला यश ,‘बिद्री’ साखर कारखान्याचा उस दराबाबत 'यु टर्न' ३ हजार ६१४ पहिली उचल एकरकमी देणार

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघावरून महायुतीत धुसफुस

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

SCROLL FOR NEXT