Congress raising caste-wise census
Congress raising caste-wise census  sakal
लोकसभा २०२४

Caste Census: जातनिहाय जनगणनेला काँग्रेसमधूनच विरोध! इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या भूमिकेविरोधात असल्याचा दावा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जातनिहाय जनगणना हा निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. पण काँग्रेसच्या या भूमिकेला आता काँग्रेसमधूनच विरोध होताना दिसतोय. जातनिहाय जणगणना हा मुद्दा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या तत्वांच्याविरोधातील असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे.

याबाबत त्यांनी पक्ष प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना सविस्तर पत्र लिहिलं आहे. (oppose to caste census from Congress leader aanand sharma claims it is to be against stand of indira and Rajiv Gandhi)

आनंद शर्मा यांनी १९ मार्च रोजी खर्गेंना पत्र लिहिलं आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. खर्गेंबरोबरच त्यांनी हे पत्र काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना तसेच काँग्रेस विधीमंडळ नेते आणि सर्व प्रदेशाध्यक्षांना देखील पाठवलं आहे. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, आनंद शर्मांनी लिहिलेलं हे पत्र नेमकं अशा वेळी व्हायरल झालं आहे, जेव्हा मल्लाकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रमुख विरोधीपक्षाला आर्थिकदृष्ट्या कोंडी करण्यात येत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. (Latest Marathi News)

राहुल गांधी यांनी ९ मार्च रोजी म्हटलं होतं की, जर काँग्रेस सत्तेत आली तर जातनिहाय जनगणनेचा प्रश्न सोडवला जाईल. तसेच आर्थिक बाबींवरही आरक्षणाचा विचार केला जाईल, तसेच त्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल, असंही त्यांनी म्हटलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT