Pankaja Munde sakal
लोकसभा २०२४

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

मतदारांना आमिष दाखवण्याचं काम पंकजा मुंडे यांनी केल्याचा खळबळजनक आरोप त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मतदारांना आमिष दाखवण्याचं काम पंकजा मुंडे यांनी केल्याचा खळबळजनक आरोप त्याचे प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. त्यामुळं पंकजा मुंडे यांच्यावर काय कारवाई होते? याकडं पाहावं लागणार आहे. (Pankaja Munde audio clip viral Bajrang Sonawane request to Election Commission to take action on it)

सोनावणे यांनी म्हटलं की, "माझ्या प्रतिस्पर्धी असलेल्या पंकजा मुंडे यांना आचारसंहितेत असं बोलण्याचा अधिकार आहे का? पंकजा ताईंनी अशा प्रकारे मतदारांना आमिष दाखवून काही करणं चुकीचं आहे, यामुळं आचासंहितेचा भंग होतो. याची तक्रार मी निवडणूक आयोगाकडं करणार होतो. आचारसंहिता काळात असं बोलता येत नाही पण तरीही त्या बोलल्या आहेत त्यामुळं त्यांच्यावर आयोगानं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी"

पंकजा मुंडेंची ऑडिओ क्लीप व्हायरल

पंकजा मुंडे यांची कथित ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांच्याशी संभाषणाची ही क्लीप आहे. राठोड यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्या विनंती करत असल्याचं यात दिसतंय. त्याबदल्यात राठोड यांना महामंडळावर घेण्यासाठी मदत केली जाईल, असं आमिष त्यांनी दाखवलं आहे.

ऑडिओत नेमकं काय?

ऑडिओ क्लीपमध्ये नेमकं काय म्हटलं? काल मी शेखर महाराजांशी बोलले. बापुसिंग महाराजांची पण भेट झाली. यावेळची परिस्थिती वेगळी आहे, आपण वेगळे नाहीत आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. या निवडणुकीत तुम्ही मत घेऊन पुढे काहीच होणार नाही, होऊन होऊन नुकसान मलाच होणार आहे. तुम्ही समजदारीनं हा विषय करावा, मी तुमचा विषय लक्षात घेईन. मी तुम्हाला सोबत घेईन आणि माझ्या औकातीचे जे सर्व विषय आहेत त्यासाठी तुमच्या पाठीमागे उभं राहिनं. (Latest Marathi News)

समाज माझ्याबरोबरच आहे. आपली सव्वा लाखाची मतं आहेत, त्यामुळं समाजाची इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत यावं. मी तुम्हाला विनंती करते की यापेक्षा मी तुम्हाला चांगली संधी देईल. उलट आजच्या परिस्थितीत हे लक्षात राहिल की यांनी विरोध केला. इथं ओबीसी-मराठा वाद पेटला आहे. मी तुम्हाला सोबतच ठेवीन, खोटे शब्द देत नाही तो माझा स्वभाव नाही.

महामंडळावर जी काही तुमची इच्छा आहे त्यासाठी मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करेन. तुम्ही अर्ज मागे घ्या आणि मला सांगा मी सर्व समजून घेईन प्रत्यक्षात. तुम्ही मला पाठिंबा दिल्यास समाजात तुमचं कौतुकचं होईल. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT