PM Narendra Modi  esakal
लोकसभा २०२४

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी सभा झाली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी सभा झाली. या सभेत त्यांनी आपल्या आकांक्षा व्यक्त करताना एक मोठं विधान केलं. त्यांनी म्हटलं की देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलं की मी छोटा विचार करुच शकत नाही, कायम मोठाच विचार करतो. त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु होती.

मोदी म्हणाले, "आज ऑलिम्पिकमध्ये पॅरालिम्पिकमध्ये एशियन गेम्समध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये भारताचे खेळाडू दशकांपूर्वीचे रेकॉर्ड तोडत आहेत. भारताच्या नागरिकांमध्ये आलेला आत्मविश्वास आपल्याला विकसित भारताच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवतील" (Marathi Tajya Batmya)

माझ्या तरुणांनो माझं स्वप्न आहे की, २०२९ मध्ये युवा ऑलिम्पिक भारतात व्हावेत, माझं स्वप्न आहे की २०३६ भारतात ऑलिम्पिक भारतात व्हावं. मोदी छोटा विचारच करु शकत नाही. कारण परमात्मानं जेव्हा मला मॅन्युफॅक्चर केलं तेव्हा त्यानं माझ्या डोक्यात छोटी चीप ठेवलीच नाही, फक्त मोठीच चीप ठेवली, असं मोदी यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

देशातील सुरक्षा व्यवस्थेबाबत बोलताना मोदी म्हणाले, "देशात २०१४ पूर्वी सातत्यानं घोषणा केल्या जात होत्या की, अनोळखी वस्तूपासून सावध राहा. पण आता भारतानं आपल्या सीमा देखील सुरक्षित केल्या आहेत. त्याचवेळी मोदींनी २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा उल्लेखही केला. त्यांनी म्हटलं की, पूर्वीचं काँग्रेस सरकार केवळ पाकिस्तानला इशारा देत होतं. पण आता त्यांच्या देशात जाऊन आपण आपल्या शत्रूंना मारत आहोत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT