PM Modi oath ceremony esakal
लोकसभा २०२४

PM Modi oath ceremony : शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

२०४७ पर्यंत भारताला पूर्ण रितीने विकसित करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांसंदर्भात मोदींनी सूचना केल्या. जनतेला एनडीएवर भरोसा आहे, तो विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मोदींनी केलं.

संतोष कानडे

Narendra Modi Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा सोमवारी सायंकाळी शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी संभाव्य मंत्र्यांची एक बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी मोदींनी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.

'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांनी शंभर दिवसांचा रोडमॅप उपस्थितांना सांगून त्या संदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यासोबत पेंडिंग असलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. तुम्हाला जो विभाग मिळेल, त्या विभागात लवकरात लवकर काम सुरु करा, अशाही सूचना मोदींनी केल्या.

२०४७ पर्यंत भारताला पूर्ण रितीने विकसित करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांसंदर्भात मोदींनी सूचना केल्या. जनतेला एनडीएवर भरोसा आहे, तो विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मोदींनी केलं.

बैठकीला 'या' नेत्यांची उपस्थिती

पंतप्रधानांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या बैठकीला सर्बानंद सोनोवाल, चिराग पासवान, अन्नपूर्णा देवी, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, भगीरथ चौधरी, किरेन रिजिजू, जितिन प्रसाद, एचडी कुमारस्वामी, ज्योतिरादित्य सिंधिया, निर्मला सिथेहारा यांचा समावेश होता. तसेच अजय टमटा, राव इंद्रजित सिंग, नित्यानंद राय, जीतन राम मांझी, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्र सिंह शेखावत, हर्ष मल्होत्रा, एस जयशंकर, सीआर पाटील आणि कृष्णपाल गुर्जर हे खासदारदेखील उपस्थित होते.

महाराष्ट्रातील फोन आलेल्या खासदारांची नावे

नितीन गडकरी

पीयूष गोयल

रक्षा खडसे

प्रतापराव जाधव

रामदास आठवले

मुरलीधर मोहोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT