Narendra Modi esakal
लोकसभा २०२४

किस्से निवडणुकीचे! एकीकडे बॉम्बस्फोट तर दुसरीकडे नरेंद्र मोदींची सभा

Narendra Modi: संपूर्ण भारतात तेव्हा नरेंद्र मोदींची हवा होती...पाटण्यात गांधी मैदानावर त्यांची हुंकार सभा होती. गर्दीच्या मागे धूर अन् फटाक्यांचा आवाज सुरु होता...

Sandip Kapde

खचाखच भरलेले गांधी मैदान...नरेंद्र मोदींची सभा...स्टेजवर नेतेमंडळी भाषण देते होते. अन् मागे बॉम्बस्फोट होत होते...पण फटाके समजून नेत्यांनी दुर्लक्ष केलं...हा किस्सा आहे. 27 ऑक्टोबर 2013 चा...

संपूर्ण भारतात तेव्हा नरेंद्र मोदींची हवा होती...पाटण्यात गांधी मैदानावर त्यांची हुंकार सभा होती. गर्दीच्या मागे धूर अन् फटाक्यांचा आवाज सुरु होता....पण हे फटाके नव्हते तर पाटण्यात बॉम्ब  फुटत होते आणि या बॉम्बच्या आवाजात नरेंद्र मोदी यांनी सभेला संबोधित केले.

मोदी तेव्हा पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार होते. सकाळी दहा वाजल्यापासूनच गांधी मैदान तुडुंब भरू लागलं, पण पुढे काय होणार हे कोणालाच कळत नव्हते. नरेंद्र मोदी सभास्थळी यायला थोडा वेळ होता... मात्र त्याचवेळी पाटणा रेल्वे स्थानकावर स्फोट झाला...

रेल्वे स्थानकाच्या बाथरुममध्ये दहशतवादी बॉम्ब सेट करत होते. वेळ ठरवत असताना बॉम्बचा स्फोट झाला...एक दहशतवादी तिथेच जखमी राहिला, तर दुसरा बाहेर पकडला गेला. पण त्या दिवशी बॉम्बस्फोटांची ही सुरुवात होती, कारण त्यानंतर दिवसभरात एकूण 8 बॉम्बस्फोट झाले, त्यापैकी 5 गांधी मैदानाच्या आत होते. पण एवढं होऊनही सभा थांबली नाही कारण गांधी मैदान एवढं मोठं होतं की समोर उभ्या असलेल्या लोकांना मागे काय चाललंय ते कळत नव्हतं.

नरेंद्र मोदी यांनी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास भाषण केले, ते त्यांच्या नेहमीच्या भाषणापेक्षा कमी होते, पण ज्या वातावरणात हे भाषण केले जात होते ते अतिशय महत्त्वाचे होते. रॅलीनंतर गांधी मैदानातही स्फोट झाले, नरेंद्र मोदींच्या भाषणापूर्वीच मैदानाच्या विविध भागात स्फोट झाले. यावरुन राजकारण देखील झालं.  केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि राज्यात नितीशकुमार मुख्यमंत्री होते...

पुढे इंडियन मुजाहिद्दीनने या स्फोटाची संपूर्ण जबाबदारी घेतली. एनआयए कोर्टाने 2021 मध्ये या प्रकरणी 9 दहशतवाद्यांना शिक्षा सुनावली. चार जणांना फाशी देण्यात आली, दोघांना जन्मठेप... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident News : कोल्हापूरमध्ये सातेरीच्या दरीत पाचशे फुट चारचाकी कोसळली, वाहनात पती पत्नी; बचावकार्य सुरू

Arbaaz Khan Blessed with a Baby Girl: अरबाज खान पुन्हा बाबा झाला, शूराने दिला गोंडस मुलीला जन्म

Latest Marathi News Live Update : मनुवादी वकिलाचा CJIवर हल्ला लोकशाहीला घातक : रोहित पवार

भाजप आमदार तडीपार गुंडाच्या कार्यक्रमात, दमदाटी करणाऱ्यांना लाथा घालण्याचा 'सल्ला'

कोणी तरी येणार येणार गं! भारती सिंग पुन्हा आई होणार, चाहत्यांना दिली गुडन्यूज, म्हणाली...'आम्ही पुन्हा प्रेग्नेंट'

SCROLL FOR NEXT