Pune Baramati Lok Sabha Counting Koregaon Park esakal
लोकसभा २०२४

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोरेगाव पार्क परिसरात तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

साउथ मेन रस्ता मध्यरात्रीपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. लेन क्रमांक दोन, तीन आणि चार आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल.

पुणे : पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी (Pune Baramati Lok Sabha Counting) कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) गोदामामध्ये मंगळवारी (ता. ४) होणार आहे. यादिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोरेगाव पार्क परिसरात तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. तसेच, सरकारी आणि खासगी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरेगाव पार्क परिसरातील वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेता चार जून रोजी पहाटे पाच ते सायंकाळी पाच या कालावधीत ब्ल्यू डायमंड चौक ते सर्किट हाउस चौकदरम्यान हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सोडण्यात येईल. तसेच, साउथ मेन रस्ता मध्यरात्रीपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. लेन क्रमांक दोन, तीन आणि चार आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. पर्यायी मार्ग : नॉर्थ मेन रस्ता आणि अंतर्गत गल्ल्यांचा वापर करावा.

पर्यायी मार्गांचा वापर करावा

चार जून रोजी मुंढवा, कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन भागातील ताडीगुत्ता, एबीसी फार्म चौक, के.पी. जंक्शन, महात्मा गांधी जंक्शन, ब्ल्यू डायमंड चौक, मोबोज चौक, जहाँगीर चौक, कौन्सिल हॉल चौक, नॉर्थ मेन रस्ता, बंडगार्डन रस्ता आणि कोरेगाव पार्क रस्ता परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

वाहनांसाठी पार्किंगची ठिकाणे, वाहन क्षमता

  • पूज्य कस्तुरबा गांधी नॉर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क

  • (फक्त प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी) - ७००

  • रोही व्हिला लॉन्स, कोरेगाव पार्क लेन क्रमांक सात

  • (नागरिकांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहने) - ७००

  • द पूना स्कूल ॲण्ड होम फॉर द ब्लाइंड ट्रस्ट, नॉर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क

  • (सर्वांसाठी चारचाकी वाहने) - ९००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT