काँग्रेसच्या उमेदवार वाय.एस. शर्मिला यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी हे शनिवारी आंध्र प्रदेशात आले होते esakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : मोदींकडे तिघांचा रिमोट ; राहुल गांधी यांची जगन, पवन, बाबू यांच्यावर टीका

Election Poll : ‘राजशेखर रेड्डी यांनी संपूर्ण राज्यात काढलेली पदयात्रा माझ्या ‘भारत जोडो’ यात्रेमागील प्रेरणा होती : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा

Andhra Pradesh News : ‘‘भाजपचा अर्थ ‘बाबू (टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू), जगन आणि पवन (जनसेनाचे संस्थापक पवन कल्याण) असा आहे. या तिन्ही नेत्यांचा रिमोट कंट्रोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कडप्पा येथील प्रचारसभेत केली.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी आणि भाजपसह अन्य विरोधी पक्षांना राहुल गांधी यांनी भाषणात लक्ष्य केले. अांध्र प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची आठवण काढताना ते म्हणाले, ‘‘राजशेखर रेड्डी यांनी संपूर्ण राज्यात काढलेली पदयात्रा माझ्या ‘भारत जोडो’ यात्रेमागील प्रेरणा होती. ते माझे वडील राजीव गांधी यांना भावासमान होते. दोन्ही नेत्यांचे वैयक्तिक संबंधही होते.’’

‘‘आंध्र प्रदेशाचा कारभार भाजपची ‘बी टीम’ चालवित आहे. ‘बी’चा अर्थ बाबू, ‘जे’ म्हणजे जगन आणि ‘पी’चा अर्थ पवन अशी भाजपची ‘बी टीम’ आहे. या तिघांचा रिमोट कंट्रोल मोदींकडे आहे.’’ हे नेते मोदींच्या नियंत्रणाखाली आहेत कारण त्यांच्याकडे ‘ईडी’, ‘सीबीआय’ आणि इतर तपास संस्था आहेत,’’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणांत शर्मिला यांना शुभेच्छा देत आंध्रात चांगले यश मिळेल, असा दावा केला. ‘वायएसआर’ यांच्या मूल्यांना त्या लोकसभेत न्याय देऊ शकतील, असेही ते म्हणाले.

‘‘यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात ‘इंडिया’ आघाडी सत्तेवर आल्यानंतर आंध्र प्रदेशला दहा वर्षे विशेष श्रेणीचा दर्जा दिला जाईल. तसेच पोलावरम प्रकल्प, कडप्पा पोलाद प्रकल्प आणि इतर आश्वासने पूर्ण करण्यात येतील,’’ असे त्यांनी सांगितले. माझी ‘बहीण’ आणि आंध्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षा वाय.एस. शर्मिला यांना लोकसभेत पाठवण्याचे आवाहन गांधी यांनी कडप्पा आणि आंध्र प्रदेशातील नागरिकांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT