Rahul Gandhi sakal
लोकसभा २०२४

Rahul Gandhi : शेतकरी अन् तरुणांचे कुणीच ऐकत नाही ; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

‘‘या देशातील शेतकरी किमान हमी भावाची (एमएसपी) मागणी करत आहेत तर तरुणांना रोजगार हवा आहे पण त्यांचे म्हणणे कुणीच ऐकून घेत नाही.

सकाळ वृत्तसेवा

जयपूर : ‘‘या देशातील शेतकरी किमान हमी भावाची (एमएसपी) मागणी करत आहेत तर तरुणांना रोजगार हवा आहे पण त्यांचे म्हणणे कुणीच ऐकून घेत नाही. या देशामध्ये लोकशाही आणि राज्यघटना टिकणार की नाही? याचा फैसला याच निवडणुकीमध्ये होईल,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज येथील सभेत केले.

राहुल म्हणाले, ‘‘ही निवडणूक या देशातील मागासवर्गीय, दलित, आदिवासी व गरीब जनतेची आहे. हे सरकार चोहोबाजूंनी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असून पक्षाची बँक खाती देखील गोठविण्यात आली आहेत. ही निवडणूक देशातील गरीब जनता विरुद्ध २२ ते २५ मोजके अब्जाधीश उद्योजक यांच्यातील आहे.’’ काँग्रेसचे उमेदवार गोविंदराम मेघवाल व कुलदीप इंदोरा यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन केले होते.

खटाखट पैसे येतील...

बिकानेर येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आमचे सरकार आल्यास दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांमधील कुटुंबप्रमुख महिलेच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये देण्यात येतील. ‘‘खटाखट खटाखट पैसे येत राहतील आणि एका झटक्यात आम्ही देशातील गरिबी हटवू,’’ असा दावा राहुल यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT