Raj Thackeray
Raj Thackeray eSakal
लोकसभा २०२४

Raj Thackeray : उत्कंठेच्या धगीवर राज यांचा अपेक्षित निर्णय! राजकीय वर्तुळात फारशी चर्चा नाही, माध्यमांनीच ताणली उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा

- पांडुरंग म्हस्के

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर करण्याची भूमिका अपेक्षित असल्याने भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या काही नेत्यांकडून झालेले स्वागत वगळता राजकीय वर्तुळात फारशा प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. मुळात राज ठाकरे अशी भूमिका घेणार हे फार अनपेक्षित नसले, तरी गेल्या काही दिवसांत त्यांचा गुढीपाडवा मेळावा आणि त्यात जाहीर करण्यात येणारी भूमिका याबाबत इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून उगाचच उत्सुकता ताणली जात होती.

गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी घेतलेली भूमिका विरोधी पक्षांना फायद्याची ठरणारी होती. त्याचा अपेक्षित फायदा मागील निवडणुकीत विरोधकांना झाला नसला, तरी राज ठाकरे यांचे कौतुक सर्व स्तरातून झाले होते. आपला एकही उमेदवार रिंगणात नसताना केवळ चुकीच्या लोकांना विरोध करणारा निडर नेता अशीही त्यांची प्रतिमा तयार झाली होती.

मात्र गेल्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षाने आपल्या नेहमीच्या पद्धतीने कोहिनूर गिरणीच्या जमीन खरेदीप्रकरणात राज ठाकरे यांना खरेदीदार कंपनीचे भागीदार म्हणून सक्तवसुली संचालनामार्फत चौकशीची नोटीस पाठवली, त्यानंतरच पुढील सर्व चक्रे फिरली. या नोटिशीनंतरच राज ठाकरे यांची भूमिका हळूहळू बदलत गेली. सुरुवातीला कोणत्याच गोष्टीवर भाष्य न करता गप्प राहण्याचा पवित्रा घेऊन राज ठाकरे यांनी आपला पक्ष सायलेंट करून टाकला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच सरकारवर टीका करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांसाठी मोकळे रान मिळाले. महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा मनसे मौनात गेली. शिवसेना फुटल्यानंतर राज ठाकरे यांची भाजपच्या नेत्यांशी जवळीक वाढू लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, नितीन गडकरी यांच्या वारंवार गाठीभेटी वाढू लागल्या.

बंद दाराआड झालेल्या या भेटींचा खरा तपशील बाहेर आला नसला तरी राज ठाकरे हे भाजपच्या मार्गावर असल्याचे आडाखे बांधले जाऊ लागले. केंद्रीय नेते अमित शहा यांची राज ठाकरे यांनी दिल्ली येथे जाऊन भेट घेतली त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. कालच्या मेळाव्यातील भाषणात त्यांनी याबाबत तपशीलवार विवेचन केले. राज ठाकरे यांना सोबत घेऊनही मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मराठी मतदार शिवसेनेची साथ अपेक्षित प्रमाणावर सोडताना दिसत नसल्याचे भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आले असावे.

राज ठाकरे हवेत आणि नकोतही...

राज ठाकरे यांना प्रत्यक्ष सोबत घेऊन मराठी मतदार अपेक्षित प्रमाणात जोडले जात नाहीतच, या उलट उत्तर भारतातील अमराठी मतदार मात्र दूर जाण्याचा धोका होता. मनसेची स्थापना झाल्यानंतरच्या पहिल्या एक दोन वर्षात ज्या प्रकारे परप्रांतीयांचा मुद्दा मनसेने लावून धरला. त्या आंदोलनात परप्रांतीयांना झालेली मारहाण उत्तर भारतीय अजूनही विसरले नाहीत. त्यामुळे मनसेला सोबत घेण्याचा उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड येथील निवडणुकीत कदाचित तोटा होऊ शकतो. त्यामुळेच मनसेला थेट युतीचा घटक बनवण्यापेक्षा त्यांचा पाठिंबा काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकेल, या विचारानेच भाजपकडून राज ठाकरे यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT