Vishwajeet Kadam sakal
लोकसभा २०२४

Vishwajeet Kadam : विश्वजित कदम यांची शिष्टाई ठरली निष्फळ

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करणारे माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी काँग्रेसश्रेष्ठींकडे केलेली शिष्टाई फारशी यशस्वी झालेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करणारे माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी काँग्रेसश्रेष्ठींकडे केलेली शिष्टाई फारशी यशस्वी झालेली नाही. याबाबत प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस प्रभारींशी चर्चा करावी, असे सांगून काँग्रेस अध्यक्षांनीच यातून अंग काढून घेतले आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगली हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेला आहे.

या मतदारसंघात ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी मात्र हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असल्याने तो आपल्याकडेच राहावा असा आग्रह धरला होता. यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीत येऊन त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. या मतदारसंघात काँग्रेसचे संघटन कसे मजबूत आहे? हे पटवून देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. परंतु काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.

श्रद्धा व सबुरी ठेवा असे डॉ. विश्वजीत कदम व विशाल पाटील यांना सांगण्यात आले होते. या दोन्ही नेत्यांनी पुन्हा शुक्रवारी दिल्लीमध्ये अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व खासदार के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती.

...म्हणून युक्तिवाद योग्य

जागावाटपाच्या चर्चेत सांगलीची जागा आपल्याला मिळावी यासाठी ठाकरे गटाने केलेला युक्तिवाद अधिक मजबूत असल्याचे काँग्रेसश्रेष्ठींचे मत असल्याचे समजते. ठाकरे गटाच्या दोन जागा काँग्रेसने आपल्याकडे घेतल्या आहेत. यात कोल्हापूर व रामटेक या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या इच्छेनुसार कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात आली. काँग्रेसकडून लढण्याची महाराजांची इच्छा ठाकरे गटाने मान्य केली. रामटेकमध्ये ठाकरे गटाकडे योग्य उमेदवार नसल्याने आमदार सुनील केदार यांच्या प्रभावामुळे हा मतदारसंघही काँग्रेसकडे आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT