Sangli Lok Sabha Mahavikas Aghadi candidate Chandrahar Patil
Sangli Lok Sabha Mahavikas Aghadi candidate Chandrahar Patil esakal
लोकसभा २०२४

'माझी तुम्हाला अडचण होत असेल, तर मी निवडणुकीतून माघार घ्यायला तयार'; 'मविआ'चे उमेदवार चंद्रहार पाटलांचं मोठं विधान

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार घातला. काँग्रेस नेते, कार्यकर्ते मेळाव्याला आले नाहीत.

सांगली : ‘‘काँग्रेसचं (Congress) नेमकं दुखणं काय आहे? माझी चार वेळा उमेदवारी जाहीर झाली तरी तुम्ही स्वीकारत नाही. मला नवखा कसा म्हणता? मी २२ व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य झालो होतो. माझी तुम्हाला अडचण होत असेल तर या घडीला माघार घ्यायला तयार आहे; फक्त काँग्रेस नेत्यांनी जाहीर सांगावे, मी का नको? मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून नको, माझा कारखाना नाही, माझे वडील आमदार, खासदार नाही, माझे आजोबा मुख्यमंत्री नव्हते, म्हणून मी नको आहे का?’’ असा भावनिक सवाल मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी काँग्रेसला केला.

काँग्रेस आपला शत्रू नाही. सांगलीत जे झाले आहे, त्यावर काँग्रेसश्रेष्ठी, उद्धव ठाकरे, पवारसाहेब मार्ग काढतील. अर्ज माघारीपर्यंत संयम बाळगा. त्यानंतरही काही घडले नाही तर मैदान मोकळे असेल,’’ असा कानमंत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना दिला. येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर शिवसेना नेते नितीन बानुगडे-पाटील, उमेदवार चंद्रहार पाटील, आमदार सुमन पाटील, आमदार अरुण लाड, राष्ट्रवादीचे नेते संजय बजाज, मनोज शिंदे- म्हैसाळकर, अनिता सगरे, बाबासाहेब मुळीक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, विराज नाईक, शेखर माने, दिगंबर जाधव, प्रा. सुकुमार कांबळे आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘शिवसेना ठाकरे पक्षाने सांगलीत पैलवान उमेदवार दिला आहे. राजबिंडा चेहऱ्याचा, दमदार तब्येतीचा हा नवा चेहरा आहे. जनता आमचे जुने चेहरे पाहून कंटाळल्याने ठाकरेंनी कदाचित चंद्रहारची निवड केली आहे. त्यांना राजकीय पार्श्‍वभूमी नाही. ते चांगली लढत देतील, आता लढाईला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी आघाडीचे काम खंबीरपणे करेल, ही आमची कमिटमेंट आहे. तुम्हीही तसे राहा. कुणाशी संबंध असो वा नसो; आपली विश्‍वासार्हता जपली पाहिजे. काहींना निर्णय पचनी पडले नसतील, मात्र पाच-सहा दिवसांत सगळे ठीक होईल. तोवर संयम बाळगा.’’

ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा आहे. त्यात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे. त्यासाठी तीन पक्षांनी हातात हात घालून काम करायला हवे. ही भाजपला हरवण्याची लढाई आहे. आम्ही लढलो नाही तर अडचण होईल, असा विचार करण्याचे कारण नाही. चंद्रहार, तुम्ही अर्ज माघारीपर्यंत गोड बोला. विश्‍वासात घेऊन मार्ग काढा.’’

नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांना सत्तेतून बाहेर काढले, मात्र जनतेच्या मनातून बाहेर कसे काढणार? भाजप शेतकरीद्रोही पक्ष आहे. त्यांच्या विरोधातील एकजुटीची ही लढाई आहे. फोडा आणि राज्य करा नीतीला बळी पडू नका. आता सोबत येतील त्यांना घेऊन किंवा त्यांच्या शिवाय लढाई लढायची आहे.’’

संजय विभूते यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, ‘‘शिवसेनेची सतत लायकी काढली जात आहे. चुकीची वागणूक दिली जात आहे. जे लायकी काढतात ते २०१९ ला का निवडून आले नाहीत? तुमची एवढी लायकी असताना राज्यात एक खासदार होता, आमचे १८ खासदार होते. शिवसैनिक कोणत्याही स्थितीत लढणारा आहे. ही लढाई नेटाने लढू.’’ शंभुराज काटकर, ऋषिकेश पाटील, संगीता हारगे, अभिजित हारगे, हरिदास पाटील यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसचा बहिष्कार

महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार घातला. काँग्रेस नेते, कार्यकर्ते मेळाव्याला आले नाहीत. व्यासपीठावरील फलकावर आमदार विश्‍वजित कदम यांचे मोठे छायाचित्र लावण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT