Sangli Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत, पण..; वसंतदादांचा दाखला देत काय म्हणाले संजय राऊत?

विशाल पाटील (Vishal Patil) हे समजूतदार आहेत. वसंतदादांचे ते नातू आहेत.

सकाळ डिजिटल टीम

विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या मनातही विशालबाबत प्रेम आहे; पण त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.

सांगली : ‘‘विशाल पाटील (Vishal Patil) हे समजूतदार आहेत. वसंतदादांचे ते नातू आहेत. देश संकटात आल्यावर वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी कोणताही व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थ न पाहता शत्रूशी युद्ध केले. विशाल यांचा ‘डीएनए’ तोच आहे, त्यांचा आणि माझा आजही उत्तम संवाद आहे. त्यामुळे मला वाटत नाही की, क्रांतिकारी विचारापेक्षा विशाल वेगळी भूमिका घेतील,’’ असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.

सांगलीत शनिवारी (ता. २०) सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले खासदार राऊत यांनी सांगलीत मुक्काम करत भेटीगाठी घेत आहेत.

खासदार राऊत म्हणाले, ‘‘विशाल पाटील हे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कुटुंबातील प्रमुख सदस्य आहेत. विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या मनातही विशालबाबत प्रेम आहे; पण त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. अर्ज माघारीच्या म्हणजे २२ तारखेपर्यंत वाट पाहू, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. तसेच आमदार विश्वजित कदम हेदेखील दोन दिवसांत सांगलीत येऊन मविआचा मेळावा घेतील.’’

‘‘महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर, त्याचे स्वागत केले पाहिजे. इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे का असू नयेत, असे माझे वैयक्तिक मत आहे. इंडिया आघाडीत एकत्र बसून निर्णय घेतले जातात. या पदासाठी आम्ही अनेक वर्षे शरद पवार यांच्याकडे अपेक्षेने पाहात होतो,’’ असे राऊत म्हणाले.

‘लक्षवेधी लढत बारामतीत’

‘‘इंडिया’ आघाडीला देशात लोकसभेच्या किमान ३०० जागा मिळतील. महाराष्ट्रात ३५ पेक्षा अधिकचे ध्येय आहे. देशात भाजप १८० ते २०० जागांपर्यंत मर्यादित राहील. ‘एनडीए’ २३० च्या पुढे जाणार नाही. राज्यातील लक्षवेधी लढत बारामतीत होईल. खासदार सुप्रिया सुळे या मोठ्या फरकाने विजयी होतील,’’ असे राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

SCROLL FOR NEXT