Sanjay Raut VS Vishwajeet Kadam
Sanjay Raut VS Vishwajeet Kadam esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : विश्वजीत कदमांचं विमान गुजरातच्या दिशेला भरकटू नये म्हणून..; संजय राऊतांचा थेट हल्ला

अजित झळके

'विशाल पाटील यांचे भाषण काल मी ऐकले. त्यात त्यांनी त्यांचे पायलट जिथे विमान उतरवतील तिथे मी जाईन, असं सांगितलं होतं.'

सांगली : विशाल पाटलांचे (Vishal Patil) एक भाषण मला आज सकाळी शिवसैनिकांनी ऐकायला दिले. त्यात विशाल म्हणत आहेत की विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) हे माझे पायलट आहेत. त्या पायलटचे विमान गुजरातच्या दिशेला जाऊ शकते, पण आम्ही त्या पायलटशी चर्चा करू. त्याला ट्रेनिंग देऊ, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पहिल्यांदाच विश्वजीत कदम यांच्यावर थेट हल्ला चढवला.

संजय राऊत यांनी सातत्याने सांगलीत कोणीतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपला (BJP) फायदा करून देऊ पाहत आहे का? असा आरोप केला होता. आज विशाल यांच्या भाषणाचा संदर्भ देत राऊत यांनी थेट विश्वजीत कदम यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाला आता अधिक टोकदारपणा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, विश्वजीत कदम, विशाल पाटील दिल्लीत गेल्याचे आम्हाला माहिती आहे. काल रात्री त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी आमची ही चर्चा झाली आहे. त्याची काळजी करण्याचे कारण नाही. विशाल पाटील यांचे भाषण काल मी ऐकले. त्यात त्यांनी त्यांचे पायलट जिथे विमान उतरवतील तिथे मी जाईन, असं सांगितलं होतं. त्या पहिल्या दिवशी आम्ही चर्चा करू.

राऊत पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील खासदार हा निष्क्रिय असल्याचे सगळ्यांचे एकमत झाले आहे. भाजपचा खासदार पराभूत करायचा असेल तर एकाच एक लढत झाली पाहिजे असं शिवसेना, काँग्रेससह भाजपमधील काही नेत्यांचेही मत आहे. त्यासाठी शिवसेनेला सर्वांनी एकत्रित ताकद दिली तर नक्कीच सांगलीत विजय होणार आहे.

पवारांवर बोलणे टाळले

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल पुण्यात बोलताना सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा आघाडीतील सहयोगी पक्षांना न विचारता जाहीर केली गेली, असं सांगितलं होतं. त्याबद्दलच्या प्रश्नाला राहूद्यांनी उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, पवारांवर मला काही बोलायचं नाही. परंतु, भिवंडीची जागा देखील मित्र पक्षांना विचारात न घेता जाहीर केली गेल्याचे काँग्रेसचे मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT