लोकसभा २०२४

Sanjay Nirupam: संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर? एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती

काँग्रेस नेते संजय निरुपम हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याची सध्या चर्चा आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरुपम हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चिन्ह आहेत. कारण त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिलीए. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे. (Sanjay Nirupam on the way to Shiv Sena met with CM Eknath Shinde)

काल बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांचा आमच्या पक्षात प्रवेश झाला पण त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. संजय निरुपम हे काँग्रेसवर खूपच नाराज आहेत, त्यांनी सौम्य भाषेत काँग्रेसची सर्व उतरवली आहे. त्यामुळं मला वाटतं ते येत्या दोन-तीन दिवसांत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील. जर ते आमच्याकडं आले तर त्यांचं आम्ही स्वागत करु पण दक्षिण मुंबईची जागा कोण लढवणार याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

शिरसाट पुढे म्हणाले, "मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यामागे देखील जनाधार आहे. ते जर आमच्या सोबत येत असतील तर त्यांना सत्तेत सहभागी करुन घेणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांना जागा तर सोडावीच लागेल. त्यामुळं राज ठाकरे आणि तिघे नेते मिळून याबाबत निर्णय घेतील. त्यामुळं मनसेला एक जागातरी मिळणं गरजेचं आहे आणि त्यांना ती मिळेल" (Marathi Tajya Batmya)

संजय निरुपम यांना कुठलीही ऑफर दिलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ते भेटले तर आहेत पण अद्याप पक्ष प्रवेशाबाबत कुठलाही चर्चा झालेली नाही. पण ते जेव्हा येतील तेव्हा त्याबाबत पाहुयात असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णालयात ICUमध्ये अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् विषारी धुरात कोंडले रुग्ण; कोमातील ६ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Weather Update: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी,वाचा हवामान विभागाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

‘सिरप’ची घातकी उबळ

Dharashiv Rain: धाराशिवच्या चार तालुक्यांत मुसळधार पाऊस; पाच दिवसांच्या खंडानंतर पुन्हा जोरदार तडाखा

SCROLL FOR NEXT