Satara Lok Sabha 2024 eSakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha 2024 : साताऱ्यामध्ये 'पवारनिष्ठा' पणाला.. पवारांचा बालेकिल्ला कुणाला देणार साथ?

वास्तविक, या मतदारसंघातील १९९९ पासूनच्या लोकसभा निवडणुका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. भाजपनेही या मतदारसंघात पाय रोवण्याची शिकस्त केली, पण त्यांना यश आले नव्हते.

राजेश सोळसकर

भारतीय जनता पक्षाने अखेरच्या टप्प्यात साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यात ‘हाय होल्टेज’ लढत रंगणार, हे स्पष्ट झाले आहे. खरेतर या मतदारसंघासाठी अजित पवार पहिल्यापासून आग्रही होते. जागावाटपात या मतदारसंघावर आमचाच नैसर्गिक हक्क आहे, असा त्यांचा दावा होता. इकडे उदयनराजे यांनीही उमेदवारीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तगादा लावला होता. या पेचात अखेर भाजपची सरशी झाली असून, उदयनराजेंचा लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाला असला, तरी उदयनराजे यांनी याआधीच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. महायुतीचे तीन मेळावेही झाले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनीही नुकतेच मोठे शक्तिप्रदर्शन करीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे. उदयनराजेही मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करतील. पक्षीय बलाबलाचा विचार करता महायुतीकडे चार आमदार, तर आघाडीकडे दोन आमदार आहेत.

शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप), शंभूराज देसाई (शिवसेना शिंदे), मकरंद पाटील (राष्ट्रवादी अजित पवार) आणि महेश शिंदे (शिवसेना- शिंदे) या चार आमदारांची ताकद उदयनराजेंच्या बाजूने आहे. याउलट आघाडीचे आमदार बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी- शरद पवार) आणि पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) या दोनच आमदारांची मदत शिंदे यांना होणार आहे. या बलाबलात महायुती प्रबळ दिसत असली, तर प्रत्यक्ष मतदान घडण्यासाठी अनेक ‘फॅक्टर’ काम करणार आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. यातील सातारा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजेंचे वर्चस्व असले, तरी याच मतदारसंघातील जावळी हा शशिकांत शिंदे यांचा मूळ (पुनर्रचनेच्या आधीचा) मतदारसंघ आहे.

याशिवाय, श्री. शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघात दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत मतविभागणी अटळ आहे. पाटणमध्ये शंभूराज देसाई यांची ताकद उदयनराजेंना मिळू शकते; पण, तेथेही विक्रमसिंह पाटणकर, सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) कार्यरत आहे. शिवाय, पाटणमधील माथाडी कामगार कोणाच्या बाजूने कौल देणार हाही मुद्दा महत्त्वाचा आहे.

कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर या दोन मतदारसंघांनी याआधीच्या लोकसभा निवडणुकांत अनेकदा भाजप- शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या विरोधात मताधिक्य दिले आहे. यावेळी हे दोन मतदारसंघ काय भूमिका घेतात, यावरही निकाल अवलंबून असेल. वाई मतदारसंघात सध्या मकरंद पाटील यांचे एकहाती वर्चस्व आहे. महायुतीचा घटक म्हणून ते उदयनराजे यांनाच मदत करतील. पण, श्री. पाटील यांचे बंधू हे या लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून इच्छुक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांत नाराजीचे वातावरण आहे. ही नाराजी कोणत्या दिशेला वळणार हे पाहावे लागेल.

वास्तविक, या मतदारसंघातील १९९९ पासूनच्या लोकसभा निवडणुका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. भाजपनेही या मतदारसंघात पाय रोवण्याची शिकस्त केली, पण त्यांना यश आले नव्हते. श्री. पवार यांनी प्रत्येक वेळी पुरोगामी विचारांचा जिल्हा हा मुद्दा ठळकपणे मांडला आणि आत्तापर्यंत लोकांनी त्यांना साथ दिली, ही वस्तुस्थिती आहे. अलीकडे भाजपच्या वतीने मोदी यांनी केलेल्या विकासाचा मुद्दा ठसवला जातोय. लोक कोणता मुद्दा उचलून धरणार यावर निकाल अवलंबून आहे. तात्पर्य, गेल्या २५ वर्षांपासूनचा पवारांचा हा बालेकिल्ला पक्षफुटीनंतरही त्यांनाच साथ देणार, की भाजप तो हिसकावून घेणार याचे उत्तर या निकालात दडलेले आहे.

घड्याळ चिन्ह गायब

शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हापासून आजपर्यंत येथील जनतेने राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’ला साथ दिली. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला मिळाले आहे. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यात अजित पवार यांना अपयश आल्याने २५ वर्षांनी या मतदारसंघातून घड्याळ चिन्ह गायब झाले आहे. मूळ राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये ही वेदना प्रकर्षाने दिसते. हा मुद्दाही निकालात प्रतिबिंबित होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT