Satara Lok Sabha Voters esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : 'या' गावातील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; काय आहे नेमकं कारण?

खोडशी गावातील (Khodshi Village) ग्रामस्थांनी घातलेला मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला आहे.

हेमंत पवार

खोडशीतील शासकीय जमिनीवर अतिक्रमण प्रश्न प्रशासकीय यंत्रणेने तो सोडविण्यापेक्षा त्याचा नाहक गुंता वाढवला आहे.

कऱ्हाड : कऱ्हाड (जि. सातारा) तालुक्यातील खोडशी गावातील (Khodshi Village) ग्रामस्थांनी घातलेला मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला आहे. प्रशासनाने दिलेला प्रस्ताव धुडकावत खोडशी गावाच्या हद्दीतील शासकीय गायरान जमिनीवरील प्लॉट धारकांना प्लॉट वाटप केले जात नाही, या मुद्द्यावर मतदानावर घातलेला बहिष्कार कायम आहे.

खोडशीतील शासकीय जमिनीवर अतिक्रमण प्रश्न प्रशासकीय यंत्रणेने तो सोडविण्यापेक्षा त्याचा नाहक गुंता वाढवला आहे. याच जमिनीवर वास्तव्य करणाऱ्यांना प्लॉट वाटप करण्याची चालढकल केली जात आहे. यावरुन ग्रामसभेतही चर्चा झाली होती. प्रशासकीय यंत्रणा सहकार्य करत नाही, असा आरोप करत तेथील काही ग्रामस्थांनी सामाजिक ऐक्य जोपासणाऱ्या खोडशी गावात प्लॉट वाटप हा प्रश्न निकाली निघाला की हेच ऐक्य अधिक वाढणार आहे.

संबंधित प्लॉट वाटप व्हावे अशी मागणी करुन लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय तेथील संबंधित ग्रामस्थांनी कायम ठेवून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय तेथील मतदारांनी कायम ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT