PM Narendra Modi  esakal
लोकसभा २०२४

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

संतोष कानडे

Loksabha election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी पंतप्रधानांनी संविधान बदलाच्या आरोपांवर पलटवार करत काँग्रेसकडून कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे.

साताऱ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मोदीने आर्टिकल ३७० कब्रस्थानमध्ये गाडलं आहे. ते पुन्हा लागू करण्याची हिंमत कुणामध्येच नाहीये. ३७० हटवल्यामुळे देशाची शान वाढली असून देशाच्या एकात्मतेला ताकद मिळाली आहे.

मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसकडून भाजपवर संविधान बदलण्याचा आरोप होतो आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला धक्का लावण्याची हिंमत कुणामध्येच नाहीये. उलट काँग्रेसने कर्नाटकमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देऊन संविधान बदलण्याचा प्रयत्न केला आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसने फतवा काढून मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण दिलं आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देणं हे संविधानविरोधी आहे. जोपर्यंत मोदी जिंवत आहे तोपर्यंत संविधान बदलण्याचा प्रयत्न कुणीही करु शकणार नाही, हे लिहून घ्या; असा सज्जड दम मोदींनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT