Sanjay Raut claim was dismissed by Prakash Ambedkar He clarified that still not in Mahavikas aaghadi  
लोकसभा २०२४

VBA and Shiv Sena: वंचितसोबत नेमकी काय चर्चा झाली? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं

वंचित बहुजन आघाडीनं आठ जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : वंचित बहुजन आघाडीनं आठ जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामुळं महाविकास आघाडीसोबत वंचितनं फारकत घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर आरोप करताना संजय राऊत यांनाही टार्गेट केलं होतं. त्यामुळं जागा वाटपांबाबत वंचित सोबत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं. (Shiv Sena what exactly was discussed with VBA Sanjay Raut said clearly)

संजय राऊत म्हणाले, "बंद खोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यातच आहेत. मी फक्त रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव वंचितला दिला होता. ती शिवसेनेची जागा होती त्यावर त्याग करायला शिवसेना तयार होती. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मनात कदापी किंतू परंतू नाही, ते मोठे नेते आहेत. आमची सगळ्यांची त्यांच्यासोबत खेळीमेळीत चर्चा झाली. ते आमच्यासोबत रहावेत यासाठी अखेरपर्यंत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले आहेत" (Latest Marathi News)

त्यामुळं महाविकास आघाडीत कोण खोटं बोलतंय असं मला वाटत नाही. ते ही खोटं बोलत नाहीत आम्हीही खोटं बोलत नाही. अकोल्याची जागा आमची नाही ती काँग्रेसची आहे. सिल्व्हर ओकवर आत्तापर्यंत कधीही जागा वाटपावर स्वतंत्रपणे चर्चा झालेली नाही. जागा वाटपावर एकत्रित चर्चा महाविकास आघाडी म्हणूनच बाहेर झाली आहे. सिल्व्हर ओक किंवा मातोश्रीवर जागा वाटपवार कधीच चर्चा झाली नाही, समन्वयावर नक्कीच चर्चा झाली. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, ३ तारखेला दुपारी १२ वाजता मविआची पत्रकार परिषद आहे. दुपारी १२ वाजता यामध्ये सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील त्या ठिकाणी अनेक प्रश्नांची उत्तर मिळतील. महाविकास आघाडी म्हणून आम्हाला ४८ जागा जिंकण्याचा आत्मविश्वास आहे, असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

SCROLL FOR NEXT