Supreme Court relief to Sharad Pawar group esakal
लोकसभा २०२४

Sharad Pawar: सुप्रीम कोर्टाचा शरद पवार गटाला दिलासा! तर अजित पवार अन् निवडणूक आयोगाला दिले 'हे' निर्देश

Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावरुन गोंधळ सुरु आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहे. आज याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Sandip Kapde

Sharad Pawar :  राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावरुन गोंधळ सुरु आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहे. आज याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने निवडणूक आयोग आणि अजित पवार गटाला काही सूचना दिल्या आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) अनेक निर्देश दिले.

घड्याळ चिन्हामुळे मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे ते गोठवा ही शरद पवार गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अजित पवार यांच्या गटासाठी घड्याळ हेच चिन्ह राहणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत जो अंतिम निकाल येईल त्याच्या अधीन अटींसह ते वापरता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला "तुतारी वाजवणारा माणूस" हे चिन्ह अधिकृत चिन्ह म्हणून तोपर्यंत मान्य करावं असेही निर्देश कोर्टाने दिलेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह शरद पवार गटाला वापारता येणार आहे. हे चिन्ह इतर कोणत्याही पक्षाला देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला इंग्रजी, हिंदी, मराठी माध्यमांमध्ये जाहीर नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आणि प्रचाराच्या सर्व जाहिरातींमध्ये असे नमूद केले की त्यांना वाटप केलेले 'घड्याळ' चिन्ह निवडणूक आयोगाला आव्हान देण्यावर प्रलंबित असलेल्या खटल्याच्या निकालाच्या अधीन आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची याचा अंतिम फैसला झाल्यावर ते कायम होईल असंही कोर्टानं म्हटलं आहे.

यापूर्वी सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांच्या संदर्भात हमीपत्र देण्याचे निर्देश दिले होते, ते पोस्टरमध्ये शरद पवारांचे नाव वापरणार नाहीत. अजित पवार यांच्या गटाला 'खरा राष्ट्रवादी' म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली होती. त्यानंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT