लोकसभा २०२४

Loksabha Election : रत्नागिरी-सिंधुदुर्गात उमेदवारीचे सस्पेन्स; भाजप-शिवसेनेत चढाओढ, विलंबाचा फटका कुणाला?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेकडेच (Shiv Sena) आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेत फुट पडली तरीही शिंदे शिवसेनेने या संघावर दावा कायम ठेवला आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या (Ratnagiri-Sindhudurg Loksabha Constituency) निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली तरीही अजूनही महायुतीच्या उमेदवाराच्या घोषणेचे सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू आहे तर विरोधकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. हा मतदारसंघ भाजपला जाणार की शिवसेनाला याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेकडेच (Shiv Sena) आहे. शिवसेनेत फुट पडली तरीही शिंदे शिवसेनेने या संघावर दावा कायम ठेवला आहे. याबाबत सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवर सांगत आहेत. परंतु कोकणात भाजपकडे (BJP) एकही जागा नसल्यामुळे या ठिकाणाहून लोकसभेची उमेदवारी मिळावी या दृष्टीने दबावतंत्र वापरत आहे. महायुतीच्या (Mahayuti) महाराष्ट्रासह अन्य राज्यातील काही जागा निश्चित झाल्या आहेत. मात्र काही तिढा असलेल्या जागांवर निर्णय झालेले नाहीत. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्गचा समावेश आहे.

भाजपकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी आमदार प्रमोद जठार तर शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधु किरण उर्फ भैय्या सामंत यांची नावे चर्चेत आहेत. भाजप अधिक आग्रही असल्यामुळे मित्रपक्षात चढाओढ सुरु आहे. या विलंबाचा आपसूक परिणाम प्रचारावर होत असून महायुतीकडून उमेदवाराचा चेहराच मतदरांपुढे गेलेला नाही. तो चेहरा निर्माण करण्यासाठी महायुती वर्षभर प्रयत्न करत आहे. पक्षाकडून उमेदवारी न दिल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये संभ्रम आहे.

तो दूर करण्यासाठी महायुतीला प्रचंड कसरत करावी लागणार आहे. उमेदवारीचा निर्णय दोन दिवसात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महायुतीच्या गोंधळात महाविकास आघाडीने विद्यमान खासदार विनायक राऊत यांचे नाव पुढे करत एक पाऊल पुढे टाकले आहे. ते गेली दीड वर्षे मतदारांच्या वारंवार संपर्कात आहेत. गावभेट, वाडी भेटीमधून त्यांनी वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच चेहरा मतदारांपुढे पोचला गेला आहे.

उमेदवार धनुष्यबाण की कमळाचा?

शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ असला तरी भाजप येथे कोकण पट्ट्यात एंट्री करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी शिवसेनेवर दबाव टाकण्यात येत आहे. जर उमेदवारी शिवसेनेला दिली तर कमळावर निवडणूक लढावी, असा आग्रह भाजपकडून होत असल्याची चर्चाही पुढे आली होती, मात्र त्यावरही एकमत झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उमेदवार कोण असणार आणि तो कमळावर लढणार की धनुष्यबाणावर याबाबतही संभ्रम आहे.

दृष्टिक्षेपात...

  • रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघाचे एकूण मतदार १४ लाख ३८ हजार ४७१

  • पुरुष मतदार ७ लाख ०८ हजार ४८७

  • महिला मतदार ७ लाख २९ हजार ९७३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT