Dhairyasheel Mane vs Raju Shetti esakal
लोकसभा २०२४

Hatkanangale Lok Sabha : धैर्यशील माने, राजू शेट्टींचा लागणार कस; 'वंचित', सत्यजित पाटलांच्या उमेदवारीने रंगणार चौरंगी लढत

महाविकास आघाडीचा पाठिंब्यासाठी शेट्टी यांचे प्रयत्न सुरू होते. पण, ठाकरे गटांकडून त्यांना ‘मशाल’ चिन्हावर लढण्याची ‘ऑफर’ दिली.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला असलेल्या शिरोळमधून शेट्टी यांना अवघे सात हजारांचे मताधिक्य मिळाले होते, यावरून त्यांच्याविषयी नाराजी दिसते.

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे माजी खासदार राजू शेट्टी यांचा कस लागणार आहे. या मतदारसंघातील ‘वंचित’च्या उमेदवारीने शेट्टी यांची कोंडी झाली आहे; तर सरुडकरांच्या उमेदवारीने निवडणुकीतच रंगत आली आहे.

महाविकास आघाडीचा पाठिंब्यासाठी शेट्टी यांचे प्रयत्न सुरू होते. पण, ठाकरे गटांकडून त्यांना ‘मशाल’ चिन्हावर लढण्याची ‘ऑफर’ दिली. त्याला शेट्टी (Raju Shetti) यांचा विरोध होता. ठाकरे वगळता ‘महाविकास’मधील काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट शेट्टी यांच्यासाठी आग्रह होता. पण, जागा ठाकरे गटाकडे गेल्याने व उद्धव ठाकरे यांनी सरुडकर यांची थेट उमेदवारीच जाहीर केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचाही भ्रमनिरास झाला आहे.

लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीपासून शेट्टी हे ‘महाविकास’ सोबत असतील, असे आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात होते. शेट्टी यांनीही पाठिंब्यासाठी ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेतली. पण, त्यात चिन्हावर लढा असाच आग्रह ठाकरेंचा होता. पक्षाच्या चिन्हावर लढल्यास स्वतःच्या पक्षाचे करायचे काय? पुन्हा पक्षीय बंधने नकोत या मानसिकतेत शेट्टी आघाडीपासून दुरावत गेले आणि शेवटी या मतदारसंघात ठाकरे गटाच्या रूपाने चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले.

२०१९ च्या निवडणुकीत माने-शेट्टी अशी दुरंगी लढत झाली. भाजपसमोर पर्याय नसल्याने माने यांच्या मागे भाजपची ताकद लागली. मराठा कार्ड, तरूण उमेदवार, भाषण कौशल्य आणि महायुतीची ताकद या जोरावर माने विजयी झाले. पण, आता इचलकरंजीतून भाजपसोबत असलेल्या आवाडे गटानेच माने यांच्या उमेदवारीला उघड विरोध केला आहे. यातून भाजपमधील गटबाजी उघड झाली. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासमोर विधानसभेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ते वगळता अन्य कोणी माने यांच्यासाठी झटताना दिसत नाही. त्यातून पाच वर्षांतील कामामुळे माने यांच्याविषयी नाराजी होतीच, ती आता उघडपणे व्यक्त होत आहे.

ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह घराघरांत पोहचवणे महत्त्‍वाचे आहे. त्यासाठी लोकसभा हा महत्त्वाचा पर्याय आहे. त्यातून सरुडकर यांना रिंगणात उतरले आहे. गेल्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला असलेल्या शिरोळमधून शेट्टी यांना अवघे सात हजारांचे मताधिक्य मिळाले होते, यावरून त्यांच्याविषयी नाराजी दिसते. ऊस दरावरून शेट्टी यांच्याविरोधात कारखानदार आहेत. सरुडकर हे थेट कारखानदार नसल्याने कारखानदार शेट्टी यांचा ‘कार्यक्रम’ करण्यासाठी सरुडकर यांना साथ देण्याची शक्यता आहे.

गेल्यावेळचे मताधिक्य राखण्‍याचे आव्हान

शिराळ्यातील नाईक कारखान्यात सरुडकर यांचे वडील उपाध्यक्ष आहेत. या तालुक्यातील दोन्ही नाईक बंधू सध्‍या महाविकास आघाडीसोबत आहेत. याशिवाय हातकणंगलेत काँग्रेसचा आमदार तर वाळव्यातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मदत सरुडकर यांना मिळेल. २०१९ च्या निवडणुकीत श्री. शेट्टी यांना या दोन मतदारसंघातून सुमारे ४७ हजारांचे मताधिक्य होते, त्याला सरुडकर यांच्या उमेदवारीने फटका बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT