Kolhapur Lok Sabha 2024 Esakal
लोकसभा २०२४

'शाहू महाराज निवडणुकीला उभे राहिलेत, पण त्यांचा राजहट्ट पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरकर बांधील नाहीत'; मंडलिकांचा थेट वार

त्यांना खासदारकी, आमदारकी, गोकुळ अध्यक्ष हे सगळे आपल्या घरात नोकर पाहिजेत.

सकाळ डिजिटल टीम

शाहू महाराजांची राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याने ते निवडणुकीला उभारले आहेत. पण, त्यांचा राजहट्ट पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरकर बांधील नाहीत.

कोल्हापूर : ‘मी गेल्या निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha) शिवसेना-भाजपचाच उमेदवार होतो. त्यावेळी ‘आमचं ठरलंय’ म्हणून सतेज पाटील आमच्या बरोबर होते. त्यावेळी मी प्रतिगामी नव्हतो. २०२६ पर्यंत मंडलिकच जिल्ह्याचे नेतृत्व करतील, असे ते म्हणत होते. चार दिवसांपासून मी त्यांच्यासाठी चुकीचा, प्रतिगामी ठरलो. वास्तविक आपल्याला उमेदवारी नको म्हणून त्यांनी श्रीमंत शाहू महाराजांचा (Shahu Maharaj) राजकीय बळी दिला,’ अशी खरमरीत टीका महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केली.

शहाजी लॉ कॉलेजसमोरील मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्‍घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार मंडलिक म्हणाले, ‘सतेज पाटील (Satej Patil) आज म्हणतात की, एका सहीला तीन दिवस लागले. त्यांनी कधी वैद्यकीय मदतीसाठी माझ्याकडे पत्र मागितले नाही. हवे असेल तर सांगा लगेच देतो. लोकांची कामे करण्यासाठी ते शाहू महाराजांसाठी तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय काढणार आहेत. म्हणजे त्या ‘अजिंक्यतारा’च्या शाखाच असणार आहेत.

त्यांना खासदारकी, आमदारकी, गोकुळ अध्यक्ष हे सगळे आपल्या घरात नोकर पाहिजेत. त्यांनी माझ्यावर टीका करताना विचार करावा. काळम्मावाडी योजनेसाठी सदाशिवराव मंडलिकांनी जे केले ते सर्वांनाच माहिती आहे.’ यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार के. पी. पाटील, चंद्रदीप नरके, समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे यांच्यासह तिन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

माणसे एकत्र आली की त्यांना दुःख होते...

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यातील नेत्यांच्यात फूट पाडायची आणि आपले राजकारण करायचे ही सतेज पाटील यांची कार्यपद्धती आहे. त्यामुळे माणसे एकत्र आली की त्यांना दुःख होते. समरजितसिंह घाटगे आणि मुश्रीफ एकत्र आले की त्यांना त्रास होतो. जेवढी दुकाने जास्त तेवढा आपला फायदा, असे त्यांना वाटते. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि अबकी बार ४०० पार करण्यासाठी कोल्हापूरचे दोन्ही उमेदवार दिल्लीत गेले पाहिजेत.’

ज्या गावच्या बोरी....

संजय मंडलिक म्हणाले, ‘ शाहू महाराजांची राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याने ते निवडणुकीला उभारले आहेत. पण, त्यांचा राजहट्ट पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरकर बांधील नाहीत. आम्ही त्यांच्या गादीचा सन्मान करतो. पण, कुस्तीच्या आखाड्यात दोन मल्ल समोरासमोर आले की डाव टाकला जातो. टांग मारली जाते. माती अंगावर पडते. हे होणारच. शेवटी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.’

व्यक्तिगत टीका टाळा

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘निवडणुतील प्रचार हा मुद्यांवर झाला पाहिजे. आम्ही मोदींची धोरणे कशी चांगली हे सांगतो. तुम्ही राहुल गांधींच्या चांगल्या गोष्टी सांगा. विकासाच्या मुद्यांवर प्रचार करा. व्यक्तिगत टीका टाळली पाहिजे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT