Shambhuraj Desai Kolhapur Lok Sabha
Shambhuraj Desai Kolhapur Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : 'राज्यात महायुतीचे 45, तर देशात NDA चे 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील' - शंभूराज देसाई

सकाळ डिजिटल टीम

‘नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष अथक प्रयत्न करत आहेत.'

कोल्हापूर : ‘महायुतीचे (Mahayuti) जागा वाटप परस्परांच्या सहमतीने सुरू आहे. काही ठिकाणी पेच आहेत; पण महायुतीचे तिन्ही नेते त्यावर सामंजस्याने मार्ग काढत आहेत. महाविकास आघाडीमध्ये मात्र एकवाक्यता नसल्याचे दिसून येते. आघाडीतच परस्परांवर आरोप सुरू आहेत. परस्पर उमेदवार घोषित केले जात आहेत,’ अशी टीका उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली.

ते महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते. शंभूराज देसाई म्हणाले, ‘महायुतीचे जागा वाटप पूर्ण होत आले आहे. काही जागांबद्दल पेच असल्याने चर्चा सुरू आहे. महायुतीचे नेते त्यावर तोडगा काढतील. मात्र महाविकास आघाडीची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्या जागा वाटपाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. कारण त्यांच्या नेत्यांत एकवाक्यता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राज्यातील महायुती यांच्या कामामुळे जनता प्रभावीत आहे. म्हणूनच राज्यात महायुतीचे ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून येतील.

तर देशात एनडीए आघाडीचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला ही स्वागतार्ह गोष्ट आहे. याचा लाभ महायुतीला होईल. हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही जागा महायुतीला मिळतील. कारण जिल्ह्यातील महायुतीचे नेते जोरदार प्रचार करत आहेत. मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते घेऊन शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. सातारा येथील उमेदवारीचा प्रश्नही लवकरच संपेल.’ या मेळाव्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार अमल महाडिक, के. पी. पाटील, समरजितसिंह घाटगे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

एकीकरण समितीचा निर्णय योग्यच

शंभूराज देसाई म्हणाले, ‘सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार उभे केले आहेत. मराठी भाषिकांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच ठामपणे उभी आहे. एकीकरण समितीने लोकसभेला उमेदवार उभे केले, हे योग्यच आहे.’

एकदिलाने प्रचार करू

‘नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष अथक प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी एकदिलाने काम करायला हवे. प्रचाराचे नियोजन करताना याची काळजी घेतली पाहिजे. मनामध्ये कोणतेही भेद न ठेवता संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मताधिक्य देऊया,’ असे आवाहन शंभूराज देसाई यांनी कार्यकर्त्यांना केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT