Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : प्रियांका गांधींचे विश्‍वासू सहकारी खाडेंची अखेर बंडखोरी; काँग्रेस नेत्यांच्या शिष्टाईचे प्रयत्न निष्फळ

सकाळ डिजिटल टीम

खाडे हे काँग्रेस नेत्या खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे विश्‍वासू सहकारी आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघातून काँग्रेसचे सचिव बाजीराव खाडे (Bajirao Khade) यांनी माघार न घेता अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. खाडे यांच्या या निर्णयाने सांगलीनंतर काँग्रेसमध्येही बंडखोरी झालीच. खाडे यांनी माघार घ्यावी, यासाठी कालपासून काँग्रेस (Congress) नेत्यांचे प्रयत्न सुरू होते; पण त्याला यश आले नाही.

अडीच वर्षांपासून खाडे हे लोकसभेची तयारी करत होते. त्यावेळी पक्षाकडेही तयारी केलेला उमेदवार नव्हता. खाडे हे काँग्रेस नेत्या खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे विश्‍वासू सहकारी आहेत; पण उमेदवारीसाठी त्यांच्याकडून प्रयत्न न करता ते जिल्ह्यात प्रचारातच सक्रिय राहिले. कोल्हापूर मतदारसंघ गेली २५ वर्षे काँग्रेसकडे नव्हता.

यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला खेचून आणला; पण उमेदवारी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना देण्यात आली. त्यातून नाराज झालेल्या खाडे यांनी लोकसभेसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. खाडे यांनी माघार घ्यावी, यासाठी पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, निरीक्षक आबा दळवी यांनी त्यांच्याशी चर्चा केली. स्थानिक नेत्यांनीही त्यांना संपर्क साधला.

कालपर्यंत ते लढणार नाहीत, अशी शक्यता होती; पण काल सकाळपासून त्यांचा फोनच बंद होता. स्थानिक नेत्यांनी त्यांच्या संपर्कासाठी प्रयत्न केले; पण तो शेवटपर्यंत झाला नाही. दुपारी तीन वाजता माघारीची मुदत संपल्यानंतर खाडे ‘रिचेबल’ झाले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्यामुळे नेत्यांचा शब्द डावलून खाडे हे अपक्ष म्हणून रिंगणात राहिले आहेत. त्यांना ‘ऊस धरलेला शेतकरी’ हे चिन्ह मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT