Shaktipeeth Highway Sambhajiraje Chhatrapati
Shaktipeeth Highway Sambhajiraje Chhatrapati esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : 'शेतकऱ्यांना उद्‍ध्वस्त करण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी करू नये'; संभाजीराजेंचा थेट इशारा

सकाळ डिजिटल टीम

'देशातील लोकहिताचे नवनवे कायदे कष्टकरी जनतेने लढून करायला भाग पाडले आहेत. पण, भाजप आणि मित्र पक्षांचे हे सरकार चळवळी दडपून टाकत आहेत.'

आजरा : ‘धरणांचा तालुका म्हणून ओळख निर्माण झालेल्या आजरा तालुक्यातील विस्थापित लोकांच्या पुनर्वसित जमिनी पुन्हा शक्‍ति‍पीठ महामार्गासाठी काढून घेतल्या जाणार आहेत. शक्‍तिपीठ तर कोल्हापुरात आहे. तेथे जायला कोणत्याही भाविकाने या शक्‍तिपीठ महामार्गाची (Shaktipeeth Highway) मागणी केलेली नाही. शेतकऱ्यांना उद्‍ध्वस्त करण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी करू नये. शेतकऱ्यांना उद्‍ध्वस्त करणाऱ्या या महामार्गविरोधी लढ्यात खांद्याला खांदा लावून उभा राहणार,’ असा विश्‍वास माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी दिला.

कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित खेडे (ता. आजरा) येथील प्रचार सभेत ते बोलत होते. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘तालुक्यामध्ये ठिकठिकाणी झालेल्या पाणी प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. प्रसंगी स्वतःची घरदारे सोडून विस्थापित झालेली ही मंडळी आता कुठे स्थिरस्थावर होत असताना शक्‍तिपीठ महामार्गाचा घाट सरकारकडून घातला जात आहे.

Shaktipeeth Highway Sambhajiraje Chhatrapati

एकदा विस्थापित झालेल्या या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी पुन्हा एकदा शक्‍तिपीठ महामार्गासाठी संपादित होण्याची शक्यता आहे. गरज नसलेल्या या मार्गाकरिता विस्थापितांच्या दृष्टीने जमीन संपादन हे अन्यायकारक आहे. शेतकरी आता जागरूक झाला आहे. या महामार्गाला ठिकठिकाणी विरोध होत आहे. विकासाच्या नावावर गरज नसताना कोट्यवधी रुपये उधळण्याचा हा सरकारचा डाव संघटितरीत्या हाणून पाडूया.’

कॉ. संपत देसाई म्हणाले, ‘या देशातील लोकहिताचे नवनवे कायदे कष्टकरी जनतेने लढून करायला भाग पाडले आहेत. पण, भाजप आणि मित्र पक्षांचे हे सरकार चळवळी दडपून टाकत आहेत. म्हणूनच आम्ही दडपशाही करणाऱ्या या सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीच्या बाजूने उतरलो आहोत.’ यावेळी मुकुंदराव देसाई, उदय पवार, संतोष मासोळे, रणजित देसाई, शांताराम पाटील, राजू होलम, रणजित देसाई, शिवराज देसाई, संकेत सावंत, संतोष पाटील, गंगाराम ढोकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT