Raigad Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Raigad Lok Sabha : 'जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे, तोपर्यंत संविधान बदलले जाणार नाही'; काय म्हणाले खासदार तटकरे?

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रगती झाली आणि जगात विकसित भारत म्हणून नाव उदयास आणले आहे.

सकाळ डिजिटल टीम

महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ज्या देशात नारीशक्तीचा सन्मान होतो तो देश नक्कीच प्रगतीपथावर वाटचाल करतो.

दाभोळ : जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत संविधान (Constitution) बदलले जाणार नाही; मात्र दूषित वातावरण निर्माण करून देशाच्या एकात्मतेला तडा देण्याचे काम सोकॉल्ड इंडिया आघाडीकडून केले जात आहे. त्यांच्यापासून सावध व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा (Raigad Lok Sabha) मतदार संघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केळशी येथे केले.

प्रचारसभेत तटकरे म्हणाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रगती झाली आणि जगात विकसित भारत म्हणून नाव उदयास आणले आहे. खेड्यापाड्यातील विकास केला जातो तेव्हा तो देशाला विकासाकडे नेतो. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ज्या देशात नारीशक्तीचा सन्मान होतो तो देश नक्कीच प्रगतीपथावर वाटचाल करतो.

कुणबी समाजाची १२ कोटींची वास्तू मुलुंड (मुंबई) परिसरात उभी राहिली आहे. त्या वास्तूच्या उद्‌घाटनाला अनंत गीते निमंत्रण देऊनही आले नाहीत, अशी कुत्सित बुद्धी पाहायला मिळाली. या अनंत गीते यांनी समाजाचा एकही माणूस पुढे आणला नाही. ते जातीचे राजकारण करत आहेत. गीते यांच्या भाषणात बूच, बाटली आणि भूत या व्यतिरिक्त काहीच नसते. वाऱ्‍याची जशी सुखद झुळूक येते आणि शरीराला विसावा वाटतो तशी विकासाची सुखद झुळूक तुमच्या मतदार संघात आल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द सुनील तटकरे यांनी या वेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT