Raigad Lok Sabha Vanchit Bahujan Aghadi esakal
लोकसभा २०२४

Raigad Lok Sabha : 'अंदरकी बात है, तीन एमएलए मेरे साथ है।' रायगडचे तीन आमदार वंचितच्या संपर्कात?

राज्यात अनेक मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीसमोर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे करून आव्हान दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

अंदरकी बात है तीन एमएलए मेरे साथ है।, असे म्हणत वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण (Kumudini Chavan) यांनी खळबळ उडवली आहे.

खेड : सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि अनंत गीतेंना (Anant Geete) मी बलाढ्य मानत नाही. अंदरकी बात है तीन एमएलए मेरे साथ है।, असे म्हणत वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण (Kumudini Chavan) यांनी खळबळ उडवली आहे. सोमवारी खेड तालुक्यातील भरणे या ठिकाणी चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन रायगड लोकसभा (Raigad Lok Sabha) मतदारसंघातील तीन विद्यमान आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला.

दापोली विधानसभा मतदारसंघातील वंचितच्या शाखांमध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा केली. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगत आली असून, राज्यात अनेक मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीसमोर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे करून आव्हान दिले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी दापोली मतदारसंघाचा दौरा केला.

यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. या दरम्यान त्या म्हणाल्या, वंचित पक्ष सोडला तर महायुती किंवा इंडिया आघाडीमधील कोणत्याच पक्षाला महिलांनी लोकसभेत नेतृत्व करावे, असे वाटत नाही. देशाचा विचार केल्यास फारच कमी पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली आहे.

रायगड मतदारसंघात मी सुनील तटकरे आणि अनंत गीते यांना बलाढ्य प्रतिस्पर्धी मानत नाही. कारण, गीते हे दीर्घकाळ खासदार राहिले असले तरी ते आता निष्‍क्रीय असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे तर तटकरे यांनी आपल्या मुलांना आमदार केले आहे. त्यांनी नक्की कोणाचा विकास केला, हे त्यावरून दिसते. खरे सांगायचे तर मला रायगडमधील बहुजन मराठा व अठरापगड जातीतील जनतेने उमेदवारी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT