Mahayuti vs Mahavikas Aghadi esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : 'घर टू घर' प्रचाराला आला वेग; नेते-कार्यकर्त्यांच्या पायाला भिंगरी, उन्हाच्या तडाख्यात तापले वातावरण

आघाडी आणि युतीच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली असल्याने चुरस वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आघाडी, महायुतीकडून राष्ट्रीय, राज्यपातळीवर नेते-मंडळींच्या बऱ्यापैकी सभा मतदारसंघातील विविध भागांत झाल्या आहेत.

कोल्हापूर : संवाद मेळावा, वैयक्तिक गाठीभेटी, मिसळ पे चर्चा, सभांच्या माध्यमातून जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यात आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. प्रचारासाठी तीन दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचविण्यासाठी उमेदवार, नेते, कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. त्यांनी ‘घर टू घर’ प्रचाराचा वेग वाढविला आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीकडून (Mahayuti) अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचा कोल्हापुरात प्रचार सुरू झाला. त्यानंतर हातकणंगले मतदारसंघात खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti), माजी आमदार सत्यजित पाटील, आदींनी प्रचाराचा प्रारंभ केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रचाराची गती आणखी वाढली. आघाडी आणि युतीच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली असल्याने चुरस वाढली आहे. ती प्रचारातही आहे.

ग्रामीण भागातील विविध गावांसह कोल्हापूर (Kolhapur) शहरातील विविध पेठा, कॉलनींमध्ये दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून जोरात प्रचार सुरू आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून आतापर्यंत तीन ते चारवेळा या दोन्ही उमेदवारांची पत्रके प्रत्येक मतदाराच्या घरात वितरित केली आहेत. विविध संघटना, क्षेत्रनिहाय मेळावे, संवाद कार्यक्रम घेतले जात आहेत. मतदारसंघातील प्रत्येक घटकांपर्यंत त्याद्वारे पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर महाविकास आघाडीतर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्‍या सभा घेण्यात आली. त्यात जोरदारपणे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दिवसागणिक उन्हासह प्रचाराचा पाराही वाढत आहे.

आघाडी, महायुतीकडून राष्ट्रीय, राज्यपातळीवर नेते-मंडळींच्या बऱ्यापैकी सभा मतदारसंघातील विविध भागांत झाल्या आहेत. त्यातून एकमेकांच्या पक्ष, कार्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. उमेदवारांचा बहुतांश गावांचा दौरा पूर्ण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार रविवार (ता. ५) हा प्रचारासाठीचा अखेरचा दिवस असणार आहे. या उरलेल्या दिवसांमध्ये जास्तीतजास्त मतदारांपर्यंत आपली भूमिका आणि चिन्ह पोहोचविण्यासाठी ‘घर टू घर’ प्रचारावर भर देण्याचे नियोजन उमेदवार, त्यांच्या नेत्यांनी केला आहे. त्यांच्या सूचनेनुसार कार्यकर्ते राबत आहेत. पक्षाचे स्कार्फ, टोपी घालून मतदानाचे आवाहन करत प्रत्येक मतदारापर्यंत कार्यकर्ते पोहोचत आहेत. त्याने प्रचारातील रंगत वाढत आहे.

राष्ट्रीय, स्थानिक मुद्यांवर प्रचार रंगला

महायुतींकडून दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रांतील विकास आणि यापुढील काळातील विकासाची गॅरंटी या मुद्द्यांवर अधिक भर देऊन प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीकडून देशाबरोबरच स्थानिक विकासाकडे केंद्र सरकारचे झालेले दुर्लक्ष, भविष्यात कशा पद्धतीने समाजातील विविध घटकांना न्याय देणार याबाबतचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात आहे.

पदयात्रा, सभा रंगणार

यापुढील तीन दिवसांमध्ये आता पदयात्रा आणि जिल्ह्यातील स्थानिक आणि राज्य पातळीवर काही नेत्यांच्या सभा रंगणार आहेत. शहरातील काही भागांमध्ये कॉर्नर सभांचेही नियोजन सुरू आहे. गल्ली-बोळांतून प्रचाराच्या वाहनांचा आवाज आणखी घुमणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT