Mahavikas Aghadi Shahu Chhatrapati Maharaj esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात शाहू महाराजांना MIM चा पाठिंबा; 'मविआ'ने पत्रकाद्वारे स्पष्ट केली भूमिका, काय म्हटलंय पत्रकात?

खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार बैठकीत शाहू महाराज यांना समर्थन दिले.

सकाळ डिजिटल टीम

समाजातील स्थान काय आहे, हे आम्हाला माहीत आहे. म्हणून त्यांची मागणी नसताना समर्थन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्यासाठी एमआयएमकडे (MIM) पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. या विषयाचे भांडवल करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे, अशी टीका महाविकास आघाडीतर्फे पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, शाहू महाराज यांचा विजय निश्चित असल्यानेच असे प्रकार विरोधक करत आहेत. या प्रचाराला कोल्हापूरची सूज्ञ जनता फसणार नाही. शाहू महाराज यांच्या उमेदवारीने छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार लोकसभेत जाणार याची खात्री असल्याने त्यांना जनाधार वाढत आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार बैठकीत शाहू महाराज यांना समर्थन दिले. पत्रकार बैठकीत, ‘शाहू महाराजांनी फोन केला नाही. त्यांनी समर्थन मागितले नाही. सर्वच राजकीय पक्ष राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर आधारित राजकारण करतात. शाहू महाराज कोण आहेत, त्यांचे समाजातील स्थान काय आहे, हे आम्हाला माहीत आहे. म्हणून त्यांची मागणी नसताना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.’

पत्रकावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) चे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे व ‘आप’चे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Srikant Shinde: हिंदुत्वाची विश्वासार्हता गमावली: देवदर्शनानंतर श्रीकांत शिंदेंचा राजकीय हल्लाबोल, खासदार ओमराजे निंबाळकरांसह शनिदर्शन

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Chhatrapati Sambhajinagar: घाटीची वाटचाल कॉर्पोरेटकडे ; १७ वर्षांनंतर ट्रॉमा आयसीयूचा कायापालट; वॉर्ड २९ चे लोकार्पण

Satyajeet Tambe: पेपरफुटीने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेचा बुरखा फाडला: आमदार सत्यजित तांबे; ४ लाख २८ हजारांहून उमेदवारांवर अन्याय

Latest Marathi News Update : खिद्रापूरमध्ये कोपेश्वर मंदिर बंद; अतिक्रमण वादावर ग्रामस्थांचे साखळी उपोषण

SCROLL FOR NEXT