Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : वंचित आघाडीचा निर्णय होणार दोन दिवसांत

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वसंत मोरे यांना पाठिंबा मिळणार की नाही, याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वसंत मोरे यांना पाठिंबा मिळणार की नाही, याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे.

मोरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. आंबेडकर यांच्याशी त्यांनी मुंबईत शुक्रवारी सुमारे तासभर भेट घेतली. त्या वेळी पुण्यातील निवडणुकीबाबत चर्चा झाली.

येत्या दोन दिवसांत राज्यांतील विविध भागांतील कार्यकर्त्यांशी चर्चा होणार असून, त्यात पुण्याचाही समावेश आहे. स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे आंबेडकर यांनी या वेळी नमूद केले.

दरम्यान, आंबेडकर हे पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे मोरे यांनी नमूद केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील उमेदवार अनिल जाधव यांना ६४ हजार ७९३ मते मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT