Kolhapur Lok Sabha Constituency esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : 'सहकारा'च्या व्होट बॅंकेत मतदान होणार बिनधास्त; नेत्यांकडून कोणताही निरोप नाही

जिल्ह्याचे राजकारण गटातटात गुरफटल्याने थेट निरोप आला नाही.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर जिल्हा सहकाराची पंढरी मानली जाते. येथे दूध, सेवा सोसायट्यांचे मोठे जाळे आहे.

कोल्हापूर : जिल्हा बॅंक, गोकुळ, विविध सेवा सोसायट्या, बॅंका, पतसंस्थांसह इतर कार्यालयात निरोप येईल का या धास्तीने आज अनेकांनी दिवस घालविला. या उलट आपल्या फायद्याचा काय निरोप येईल काय, याकडेही अनेक कर्मचाऱ्यांचे डोळे लागून राहिले होते. मात्र ‘सुटी आहे. मतदान (Voting) करा,’ केवळ एवढीच नोटीस निघाली. जिल्ह्याचे राजकारण गटातटात गुरफटल्याने थेट निरोप आला नाही. त्यामुळे सहकाराच्या व्होट बॅंकेतील अधिकारी-कर्मचारी-सभासद आता बिनधास्त मतदान करणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा सहकाराची पंढरी मानली जाते. येथे दूध, सेवा सोसायट्यांचे मोठे जाळे आहे. या ना त्या माध्‍यमातून शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा राजकारणाशी संबंध येतो. जिल्हा बॅंक आणि गोकुळ (Gokul) जिल्ह्यातील दोन मोठ्या सहकारातील संस्था आहेत. ग्रामीण भागातील गल्लीबोळात त्यांचे थेट सभासद आहेत. यामुळे ही एक वेगळी ‘व्होट बॅंक’ मानली जाते. यामध्ये साखर कारखान्यांतील सभासदांचा वेगळाच गट आहे. स्थानिक नेते हाच त्यांच्यासाठी पक्ष असतो. त्यामुळे स्थानिक आघाडी, गटतट यामध्येच त्यांच्‍या मतांची विभागणी होते. येथे नेत्याला मानले जाते.

विशेष म्हणजे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर याचबरोबर जिल्हा बॅंक आणि गोकुळमधील संस्थांचे संचालक यांच्यावर हे गट तट अवलंबून आहेत. त्यामुळे नेत्यांच्या राजकीय पक्षापेक्षा नेता कोणाकडे आहे, त्यांचा आपल्याला काही उपयोग झाला आहे काय? उमेदवार कोण आहे, याकडे पाहूनही मतदान होण्याची शक्यता असते.

त्यामुळे सहकार ही एक मोठी ‘व्होट बॅंक’ मानली जाते. याच व्होट बॅंकेतून कोणाला मतदान करा, असा निरोप येईल का? याची धास्तीही अधिकार-कर्मचाऱ्यांसोबत सभासदांना होती. मात्र या दोन्ही संस्थांमध्ये दोन्ही उमेदवारांच्या बाजूचे नेते असल्याने ‘सुटी आहे, मतदान करा’ एवढीच नोटीस जाहीर केली आहे. ना फायद्याचा, ना धास्तीचा निरोप सायंकाळपर्यंत पोचलाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT