Rohit Pawar 
लोकसभा २०२४

Rohit Pawar and Crab: 'त्या' खेकड्याचं नेमकं काय केलं? रोहित पवारांनी स्पष्टीकरण देताना भाजपला धरलं धारेवर

राज्य सरकारच्या कारभाराविरोधात माहिती देताना आमदार रोहित पवार पत्रकार परिषदेत प्रतिकात्मकरित्या जिवंत खेकडा घेऊन आले होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्य सरकारच्या कारभाराविरोधात माहिती देताना आमदार रोहित पवार पत्रकार परिषदेत प्रतिकात्मकरित्या जिवंत खेकडा घेऊन आले होते. पण यावरुन भाजपनं त्यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. यावरुन आता रोहित पवारांनी भाजपला धारेवर धरत त्या खेकड्याचं नेमकं काय केलं? हे देखील सांगितलं आहे. (what exactly did with that crab Rohit Pawar gave an explanation)

रोहित पवारांनी ट्विट केलं की, भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेत मी खेकडा दाखवल्यामुळं भाजप चांगलंच रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय. यातूनच त्यांनी माझ्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन घडवलं आहे. (Marathi Tajya Batmya)

वास्तविक मी दाखवलेला खेकडा हॉटेलमध्ये खाण्यासाठी वापरण्यात येणार होता आणि नंतर तो नदीत सोडून दिला त्यामुळं खरंतर त्याचा जीव वाचला. पण तिकडं भाजपची मात्र यामुळं तडफड सुरू झाली आहे. याचं कायदेशीर उत्तर मी देईलच पण तुम्ही काय म्हणणार अशा या बावचळलेल्या राजकीय खेकड्यांना? असा सवालही त्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, पेटा या प्राणीमित्र संघटनेनं देखील रोहित पवारांविरोधात निवडणूक आयोग आणि शरद पवार यांना पत्र लिहून त्यांनी राजकीय प्रचारासाठी प्राण्याला त्रास दिल्याची तक्रार केली आहे. पेटानं आपल्या पत्रात म्हटलं की, सन २०१३ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार निवडणूक प्रचारादम्यान, गाढव, बैल, हत्ती आणि गाईंच्या वापरावर बंदी घातली होता.

यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. पेटानं रोहित पवारांना देखील पत्र लिहून त्यांच्याकडील खेकडा आमच्याकडं सोपवावा आम्ही त्याची देखभाल करु असंही पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ'मधील गैरव्यवहाराची ‘ईडी’कडून चौकशी करा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT