Yavatmal-Washim Constituency sakal
लोकसभा २०२४

Yavatmal-Washim Constituency : देशमुख, पाटील यांच्यातच लढत

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवारी माजी मंत्री संजय देशमुख यांना मिळाली होती. मात्र महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत बरेच दिवस संभ्रम होता.

राजकुमार भीतकर rajkumarbhitkar.ytl@gmail.com

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवारी माजी मंत्री संजय देशमुख यांना मिळाली होती. मात्र महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत बरेच दिवस संभ्रम होता. विद्यमान खासदार भावना गवळी यांना बदलण्यात येईल, अशी चर्चा प्रारंभापासूनच होती. महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे होती. त्यावर भाजपानेही दावा ठोकल्याने युतीच्या उमेदवारीबाबत चुरस आणखी वाढली होती.

संजय राठोड की पुन्हा भावना गवळी, अशी चर्चा सुरू असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी शिवसेनेने राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करून महायुतीतील उमेदवारीवरूनचा ‘सस्पेन्स’ अखेर संपवला. त्यामुळे या मतदारसंघात आता शिवसेनेच्या शिंदे गट व उद्धव गट यांच्यातच लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यांचा या मतदारसंघावर दावा असला तरी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. महाविकास आघाडीत शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) हा मतदारसंघ सुटला असून अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री संजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महायुती व शिवसेनेच्या (शिंदे गट) पक्षाच्या उमेदवार राजश्री पाटील या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. पक्षाने हिंगोलीत हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव पाटील कोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, असे बोलले जाते. उत्कृष्ट वक्ता व संघटक म्हणून त्यांची ख्याती आहे.

शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढतीच

२०१९ मध्ये या मतदारसंघात ६१.०९ टक्के मतदान झाले. शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी व काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यात चुरशीची लढाई झाली. भावना गवळी यांना ५,४२,०९८ मते पडली, तर, माणिकराव ठाकरे यांना ४,२४,१५९ मत पडली. ठाकरेंपेक्षा दहा टक्के जास्त मते घेऊन गवळी विजयी झाल्या. दरवेळी या मतदारसंघात शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी बाद झाल्याने वंचितचा उमेदवार लढतीत राहणार नाही. गेल्यावेळी (२०१९) ‘वंचित’चे उमेदवार प्रवीण पवार यांनी ९४,२२८ मते मिळविली होती.

सामाजिक समीकरण

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात वाशीम जिल्ह्यातील वाशीम व कारंजा विधानसभा मतदारसंघ व यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, दिग्रस आणि पुसद विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. दिग्रस, पुसद व कारंजा हे तिन्ही मतदारसंघ बंजाराबहुल आहेत. तर, राळेगाव, यवतमाळसह इतर चारही मतदारसंघात कुणबी मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे या मतदारसंघात एकतर बंजारा किंवा कुणबी उमेदवार देण्याची परंपरा निर्माण झाली. यावेळी कुणबीविरुद्ध कुणबी असे समीकरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT