Loksabha 2019

Loksabha 2019 : लोकसभेच्या प्रयोगात विधानसभेची "लिटमस टेस्ट'

सकाळवृत्तसेवा

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व राज्य सरकारचे "संकटमोचक' बनलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या रावेर मतदारसंघात येतात. खडसेंना पक्षाने "साइडट्रॅक' केल्यानंतरही या मतदारसंघात खडसेंचा प्रभाव कायम आहे. चोपडा वगळता सर्व पाच विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार असले तरी राष्ट्रवादीचा जोर व या निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसलाही "हात- पाय' पसरायला जागा मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची ही "लिटमस टेस्ट' ठरलीय... 

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून अपवाद वगळता भाजपचे वर्चस्व आहे. यंदाच्या निवडणुकीतही भाजपनेते विजयाचा दावा करीत आहेत. कारण, या लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच ठिकाणी भाजपचे तर एका क्षेत्रात शिवसेनेचे आमदार आहे. या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत समीकरणे बदलली तर ती निवडणूक रंगतदार ठरेल, यात शंका नाही. 

चोपड्यात सेना-राष्ट्रवादी

चोपडा या अनु. जमाती राखीव विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे प्रा. चंद्रकांत सोनवणे आमदार असले तरी हा मतदारसंघ अरुणभाई गुजराथींमुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या विधानसभेच्या वेळी भाजपवासी झालेले तत्कालीन आमदार व विजयकुमार गावीत यांचे मेव्हणे जगदीश वळवी पुन्हा राष्ट्रवादीकडून लढण्याची शक्‍यता आहे. अशावेळी युती झाली नाही तर भाजपला उमेदवार शोधावा लागेल. 

रावेरमध्ये जावळेंविरोधात कोण?

रावेर विधानसभा क्षेत्रात भाजपचे हरिभाऊ जावळे आमदार आहेत. या मतदारसंघातून गिरीश महाजनांचे निकटवर्ती अनिल चौधरी यांनी तयारी सुरु केल्याचे सांगितले जाते. मात्र, खडसेंचे विरोधक असल्याने चौधरी लोकसभेच्या प्रचारापासून दूर होते. जावळेंनी मात्र प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. अशावेळी रावेरमधून भाजपतर्फे जावळेंना उमेदवारी मिळते की, चौधरींना? हा प्रश्‍नच आहे. आघाडीच्या वाटपात ही जागा कॉंग्रेसकडे असल्याने माजी आमदार शिरीष चौधरीच उमेदवार राहण्याची शक्‍यता आहे. 

"इन्टॅक्‍ट' जामनेर

जलसंपदामंत्री गिरीश महाजनांचा हा मतदारसंघ. मराठा समाज बहुसंख्येने असल्यावरही पाच टर्मपासून आमदारकी गाजविणारे अल्पसंख्य समाजाचे गिरीश महाजन यांचा हा गड. याच मतदारसंघातून भाजप उमेदवाराला सर्वाधिक लीड देण्याची पैज महाजनांनी लावलीय. महाजनांना मात देईल, असा विरोधी चेहरा याठिकाणी नाही. आजमितीस भाजपसाठी सर्वाधिक "इन्टॅक्‍ट' असा हा मतदारसंघ असून महाजनांच्या विरोधात राष्ट्रवादीकडे संजय गरुड, प्रमोद पाटील असे चेहरे समोर आहेत. 

खडसेंचे मुक्ताईनगर

एकनाथ खडसेंचा मतदारसंघ म्हणून याची ओळख. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असले तरी खडसेंचे कट्टर विरोधक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचीच ओळख आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने सेनेच्या पाटलांना गळ घातल्याचे बोलले जाते. मात्र, त्यांचा इंटरेस्ट विधानसभेत आहे, त्यामुळे खडसेंविरोधात कोण? हाच खरा इथला प्रश्‍न. 

भुसावळला भाजपचे वर्चस्व

भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे आमदार आहेत. पालिकाही भाजपच्या ताब्यात. मात्र, माजी आमदार संतोष चौधरींची सेनेतून घरवापसी झाल्याने राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे. मतदारसंघ अनु. जातीसाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीकडून उमेदवाराचा शोध सुरु झाला आहे. युती झाली नाही तर ऍड. राजेश झाल्टे सेनेकडून लढतील, असे दिसते. 

मलकापूरमध्ये चुरस

रावेर लोकसभेतील हा एकमेव मतदारसंघ जळगाव जिल्ह्याच्या बाहेर बुलडाणा जिल्ह्यात आहे. चैनसुख संचेती हे भाजपचे आमदार असले तरी गेल्या काही वर्षांत येथील राजकीय समीकरणे बदलत असून कॉंग्रेसचे वर्चस्व वाढल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आव्हान उभे करु शकेल, असे दिसते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT