Voting
Voting 
Loksabha 2019

Loksabha 2019 : पवार की विखे!? कोण मारणार बाजी; घराण्यांची प्रतिष्ठा पणाला

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या २३ एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी सुप्रिया सुळे, डॉ. सुजय विखे, नीलेश राणे, रक्षा खडसे आणि धैर्यशील माने या दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे.

आज शेवटच्या दिवशी सर्वपक्षीय उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. या तिसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाडा आणि कोकणातील प्रत्येकी दोन, उत्तर महाराष्ट्रातील तीन, तर पश्‍चिम महाराष्ट्रतील सात अशा एकूण १४ लोकसभा मतदारसंघांत येत्या मंगळवारी मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये विविध राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने अवघ्या राज्याचे लक्ष या बहुरंगी लढतींकडे लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे  बारामतीमधून विजयाची हॅट्ट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपले चिरंजीव डॉ. सुजय यांच्यासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावली आहे.

सुजय विखे हे नगरमधून भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवित आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गात चिरंजीव नीलेशसाठी ठाण मांडून बसले आहेत. तळ कोकणातील वर्चस्व टिकविण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. भाजपमध्ये उपेक्षा सहन करणारे उत्तर महाराष्ट्रातील नेते एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे या  रावेरमधून निवडणूक लढवत आहेत, तर राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांनी विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगलेत आव्हान दिले आहे. जालन्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काँग्रेसचे विलास औताडे निवडणूक लढवित आहेत, दानवेंचा विजय निश्‍चित मानला जात असला तरी त्यांना प्रस्थापितविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT