Rahul Gandhi and Abhijit Pawar. 
Loksabha 2019

RahulWithSakal : मी लोकांचे ऐकून घेतो, त्यांची टीकाही सहन करतो : राहुल गांधी

सकाळवृत्तसेवा

प्रश्‍न : मग तुम्ही सत्तेवर आलात तर हे सगळे बदलाल?

उत्तर : निश्‍चितच! जीएसटी बदलला जाईल. सध्याची जीएसटी प्रणाली भारताला कमजोर करणारी आहे. आपल्याला एक कर हवाय, कमी कर हवाय आणि सुटसुटीत कर हवाय. त्याच्या नोंदी ठेवणे, अहवाल देणे सोपे असावे. कोणत्याही तज्ज्ञाची मदत न घेता सामान्य व्यक्तीही आपल्या कराची विवरणपत्रे स्वतः दाखल करू शकेल, एवढी सुटसुटीत प्रणाली हवी. त्यादृष्टीने आम्ही आमचा गृहपाठही केलेला आहे. जीएसटीमध्ये बदल केला पाहिजे, एवढेच मी म्हणत नाही, आम्ही जीएसटी बदलाच्या प्रक्रियेबाबत आभ्यासही केलेला आहे. त्याचे गणित आम्हीही मांडलेले आहे. देशाला एकच जीएसटी हवा या कल्पनेची चाचणीदेखील आम्ही घेतलेली आहे.

प्रश्‍न : काँग्रेसच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल करण्याविषयी तुम्ही चर्चा करत आहात. अनेक तज्ज्ञांशी तुम्ही सातत्याने सल्लामसलत करत असता, त्याचबरोबर तळागाळातल्या लोकांपर्यंतही पोचण्याचा तुमचा प्रयत्न आहे का?
उत्तर : जेव्हा भारत एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा तो ती करतोच. तुम्ही हरितक्रांती पाहा. पुढाकार कोणाचाही असो, अखेर ते संपूर्ण भारताचे यश आहे. जेव्हा तुम्ही आयटी क्षेत्रातील क्रांतीकडे पाहता, तेव्हा ते भारताने करून दाखवलेले दिसते. जेव्हा श्‍वेतक्रांतीकडे पाहतो तेव्हाही लक्षात येते भारताने ते करून दाखवले आहे. माझ्या मनात कोणताही गोंधळ नाही. हे सगळे एका व्यक्तीने केले आहे, असे अजिबात नाही. ‘‘सत्तर साल से हाथी सो रहा है’’ असे म्हणून मी कधीच भारतीयांचा अपमान करणार नाही. हाथी कभी नहीं सोता. खरे तर, हाथी कभी सो नही सकता! मोकळेपणानेच सांगायचे तर, हिंदुस्थान हाथी नही है, शेर है! 

हा पूर्णतः वेगळाच दृष्टिकोन आहे. मी स्वतःकडे गोष्टी घडवून आणणारा, त्यासाठी इतरांना सक्षम करणारा अशा दृष्टीने पाहतो, मी लोकांचे ऐकून घेतो, त्यांची टीकाही सहन करतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या भूमिका समजून घेतो. नरेंद्र मोदी स्वतःला देशाच्या केंद्रस्थानी मानतात. नाही, या देशाच्या केंद्रस्थानी कोणीही नाही. हा देश खूप मोठा आहे, खूप हुशार आहे, खूप शक्तिमान आहे, एकच एक व्यक्ती या देशाच्या केंद्रस्थानी असू शकत नाही.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Accident News: भीषण अपघात! महामार्गावर दोन बसची समोरासमोर टक्कर; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT