Loksabha 2019

Loksabha 2019 : मुख्यमंत्री दाबलेला फुगा, यांचे कपडे काढले तर आमचा पोपट दिसला : राज ठाकरे

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना फुग्याशी केली. फुगवलेला फुगा जसा दाबला जातो तसा त्याचा आकार होतो. फडणवीस माझ्याविरोधात बरळले. साला, यांचे कपडे आम्ही काढले आणि यांना आमचा पोपट दिसला. बघायचं असेल तर आणलंय सगळं असा जोरदार हल्लाबोल केला.

यंदाची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे दोन दिवसापूर्वी घोषित केल्यानंतर राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका विषद करण्यासाठी आज मेळावा आयोजित केला होता. राज यांच्या अर्ध्यातासाच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर खास शैलीत टिकेची झोड उठवली. 

निवडणुकीच्या प्रचारात सध्या चर्चिला जाणा-या 'चौकीदार' या शब्दावर राज ठाकरे यांनी चौफेर टोलबाजी केली. पंतप्रधान स्वतःला चौकीदार म्हणतात, सर्वोच्च पदावरील व्यक्‍ति इतका छोटा विचार करत असेल तर पंतप्रधान कसा असेल, असा टोला राज यांनी लगावला. कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते म्हणाले की, चौकीदाराच्या भानगडीत पडू नका, या निवडणुकीत तुम्हाला जे करायचे आहे ते मोदींच्या विरोधात करायचे आहे.

मोदींच्या विरोधात मतदान करण्याचे शिवसेनेलाही आवाहन
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर एका शब्दानेही टिका केली नाही. याउलट शिवसैनिकांनी मोदींच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावर बोलताना राज म्हणाले की, देशावरील संकट दूर होणे गरजेचे आहे. तुमच्या समोर थैल्या येतील तर त्या रिकाम्या करा, पाच वर्ष देश यांनी लुटला आता यांना लुटायची हिच वेळ आहे.

राज ठाकरे काय म्हणाले

- दोन्ही काँग्रेस किंवा कुणासोबतही आघाडीबाबत चर्चा झाली नाही, मात्र दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना मी सांगितले होते की लोकसभा निवडणुकीत मला रस नाही, परंतू मी जे करेन त्याचा फायदा तुम्हाला होईल.
- लोकसभा निवडणुकीसाठी मी सभा घेणार आणि त्या मोदी शहांच्या विरोधात असतील.
- गुढी पाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलेन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT