RanaJagjitSingh Patil and Parth Pawar
RanaJagjitSingh Patil and Parth Pawar 
Loksabha 2019

Loksabha 2019 : पार्थ अन् राणा.. दोन भाऊ एकाचवेळी लोकसभेच्या रिंगणात

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : महाराष्ट्रातील दोन बलाढ्य नेत्यांचे वारसदार व नातेसबंधाने अत्यंत जिव्हाळ्याचे संबध असलेले राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील व पार्थ अजित पवार यंदा लोकसभेमध्ये नशीब अजमवणार आहेत. पार्थ पवार हे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांचा भाचा तर राणाजगजितसिंह पाटील यांचे आतेभाऊ आहेत. पार्थ पवार हे मावळमधून आणि राणाजगजितसिंह पाटील हे उस्मानाबाद मतदारंसघातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. 

सुरवातीपासुन राजकारणात शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. या संबधाचे पुढे नातेसबंधामध्ये रुपांतर झाले. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या बहिण सुनेत्रा यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला. तेव्हापासुन हे दोन्ही घराणे अधिक जवळ आले. डॉ. पद्मसिंह पाटीला यांनी शरद पवार यांच्याबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक महत्वाच्या पदावर काम केले. पुढे अजित पवार यांचाही राजकारणात प्रवेश झाला. डॉ. पाटील यांचे वारसदार म्हणून राणाजगजितसिंह पाटील यांनी राजकारणात उडी घेतली. 

राणाजगजितसिंह पाटील यांची राजकारणात एंट्रीसुद्धा राज्यमंत्री पदाने झाली. पुढे त्यांनीही राज्यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले. आज अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ मावळमधुन पहिल्यांदा लोकसभा निवडणुक लढवत असताना उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी राणाजगजितसिंह पाटील हेही पहिल्यांदाच या निवडणुकीला तोंड देत आहेत. या दोन्ही घराण्यांसाठी हा अत्यंत चांगला योगायोग मानला जात असून, आतेभाऊ व मामेभाऊ एकाचवेळी लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने याची चांगलीच चर्चा राज्यभरामध्ये होत आहे. ही लढत दोन्ही घराण्यांसाठी प्रतिष्टेची असून, या नव्या पिढीचाही राजकीय अध्याय कसा राहणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनच जिव्हाळ्याचे नात्यांबरोबरच राजकीय संबधसुध्दा अधिक दृढ होत आहेत. त्याला आता लोकसभेची देखील किनार मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT