Udayanraje bhosale and purshottam jadhav
Udayanraje bhosale and purshottam jadhav 
Loksabha 2019

Loksabha 2019 : उदयनराजेंविरोधात उभा राहणार 'हा' तगडा उमेदवार

सकाळवृत्तसेवा

मुंबई : साताऱ्याच्या एकहाती राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाधव यांनी परत शिवबंधन बांधले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदयनराजे भोसले यांच्या समोर शिवसेनेने पुन्हा त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून जाधव यांना मैदानात उतरवण्याचा निर्धार केला आहे. 

जाधव यांनी या अगोदर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने उदयनराजे यांना लढत दिली होती. त्यानंतर 2014 मध्ये शिवसेनेने त्यांची उमेदवारी नाकारत रिपब्लिकन पक्षाला जागा सोडली तेव्हा बंड करून जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यात त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यानंतर जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, सध्या ही जागा शिवसेनेकडेच राहिली असल्याने त्यांनी परत शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

जाधव यांना कऱ्हाड दक्षिण व कऱ्हाड उत्तरमध्ये पसंती असल्याचे मानले जाते. गेल्या निवडणुकीत त्यांनी या दोन्ही तालुक्‍यांतून विक्रमी मते घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT