Naigaon Savitribai Phule Jayanti Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde : दहा एकर जागा खरेदी करुन सावित्रीबाईंचं 100 कोटींचं स्मारक उभारणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना सुरू केलेल्या आहेत.

अशपाक पटेल

स्त्रियांचा संघर्ष हा जन्मापासून नव्हे तर गर्भापासूनच सुरू आहे. विधवा प्रथा आणि बाल विवाह प्रतिबंधाचे ठराव ग्रामपंचायतस्तरावर मंजूर होत आहेत. त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे.

खंडाळा : नायगाव येथे दहा एकर जागा शासन खरेदी करणार असून, त्यावर शंभर कोटी रुपये निधी खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त (Savitribai Phule Jayanti) त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (ता. खंडाळा) येथील स्मारकास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), पालकमंत्री शंभूराज देसाई, इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मकरंद पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले प्रमुख म्हणून उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘सावित्रीबाई फुले यांच्या नावाने रखडलेले पुरस्कार देण्यात येतील. विद्यार्थिनींना उपस्थितीबाबत मिळणाऱ्या सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेतील अनुदानात वाढ करण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री व पालकमंत्र्यांच्या समवेत निर्णय घेणार आहे. शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना सुरू केलेल्या आहेत. लेक लाडकी, जिल्हा वार्षिक योजनेतून मुख्यमंत्री महिला सशक्तिकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग, विक्रीसाठीही योजना करणार आहे. इतर मागासवर्गीय घटकातील मुलींसाठी ७२ शासकीय वसतिगृह जानेवारीअखेरपर्यंत सुरू करणार आहे.’’ सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व, त्याग, योगदान यांची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भुजबळ म्हणाले, ‘‘सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून राज्याप्रमाणे संपूर्ण देशात साजरा व्हावा, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. विद्यार्थिनींना उपस्थिती भत्त्यामध्ये वाढ करावी. पंचवीस हजार रुपये रोख असणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार पुन्हा सुरू करावा. मुलींना एनडीएमधील प्रशिक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रबोधिनीला २४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रबोधिनीसाठी लवकरात लवकर जागाही उपलब्ध करून द्यावी.’’

पालकमंत्री देसाई यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन समाजात मूलभूत परिवर्तनासाठी कार्य करावे. यासाठी जागतिक दर्जाचे स्टडी सेंटर या ठिकाणी निश्चितपणे उभे करण्यात येईल, असे सांगितले. सावे यांनी महाज्योतीच्या माध्यमातून एनडीए व पोलिस प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नायगावला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, ‘‘स्त्रियांचा संघर्ष हा जन्मापासून नव्हे तर गर्भापासूनच सुरू आहे. विधवा प्रथा आणि बाल विवाह प्रतिबंधाचे ठराव ग्रामपंचायतस्तरावर मंजूर होत आहेत. त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. सत्यशोधक चित्रपट शाळाशळांतून दाखवला पाहिजे.’’

या वेळी चित्रकला स्पर्धेसह विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकृत सभागृहाचे लोकार्पणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. महाज्योतीच्या ऑनलाइन पोर्टलचा प्रारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच साधना नेवसे यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने व दशरथ ननावरे यांनी सूत्रसंचालन केले.

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, पुरुषोत्तम जाधव, उपसरपंच रेश्मा कानडे, राजेंद्र नेवसे, अनुप सूर्यवंशी, अनिरुद्ध गाढवे, निखिल झगडे, आदेश जमदाडे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, बचत गटातील महिला, महाविद्यालयीन युवती व नागरिक उपस्थित होते.

गोरेंची मागणी अन् मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद

आमदार जयकुमार गोरे यांनी नायगावमध्ये शासनाने दहा एकर जमीन खरेदी करावी व त्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभे करावे, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ प्रतिसाद देऊन भव्य स्मारक उभारण्याची ग्वाही कार्यक्रमात दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT