Military sakal solapur
महाराष्ट्र बातम्या

देशरक्षणासाठी सोलापूरचे १०,००० सुपुत्र! दरवर्षी ३०० ते ४०० तरुण सैन्यात भरती; चीन-पाकिस्तान युद्धात सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४२ सुपुत्रांनी पत्करले हौतात्म्य

सत्याग्रही व क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले; ते अबाधित राखण्यासाठी देशाच्या विविध सीमांवर वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील सैनिक व अधिकारी असे १० हजार सुपुत्र तैनात आहेत. तर चीन व पाकिस्तानशी झालेल्या युद्धांसह विविध लष्करी मोहिमांत जिल्ह्यातील ४२ सुपुत्रांनी हौतात्म्य पत्करले आहे.

तात्या लांडगे

आप्पासाहेब हत्ताळे

सोलापूर : सत्याग्रही व क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले; ते अबाधित राखण्यासाठी देशाच्या विविध सीमांवर वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील सैनिक व अधिकारी असे १० हजार सुपुत्र तैनात आहेत. तर चीन व पाकिस्तानशी झालेल्या युद्धांसह विविध लष्करी मोहिमांत जिल्ह्यातील ४२ सुपुत्रांनी हौतात्म्य पत्करले आहे.

महात्मा गांधी यांच्या अहिंसक आंदोलन आणि क्रांतिकारकांच्या सशस्त्र क्रांतीसह हजारो परिचित- अपरिचित भारतीयांच्या बलिदानातून देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून देशाच्या सीमांवर रात्रंदिवस ऊन- वारा- पावसातही डोळ्यांत तेल घालून पहारा देणाऱ्या सैनिकांमुळे आज भारत ७८ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे.

सध्या देशाच्या विविध सीमांवर वेगवेगळ्या ठिकाणी, भूदल, नौदल व वायुदल या तिन्ही सैन्यदलांतील शिपायांपासून ते अधिकारी अशा विविध हुद्द्यांवर सोलापूरचे १० हजार सुपुत्र तैनात आहेत. तर स्वातंत्र्यानंतर चीन, त्यानंतर पाकिस्तानशी दोनवेळा अशा तीन युद्धांसह अन्य लष्करी मोहिमांत ४२ सुपुत्रांनी हौतात्म्य पत्करले आहे. यात पाकिस्तानशी झालेल्या कारगिल युद्धातील ‘ऑपरेशन विजय’मध्ये बलिदान दिलेले सुरेश देशमुख (सोनंद, ता. सांगोला) व जम्मू- काश्‍मीरमधील पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेले सुनील काळे (बार्शी) यांचा समावेश आहे.

चीन-पाकिस्तान युद्धात ११ जणांचे हौतात्म्य

स्वातंत्र्यानंतर १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धात कासेगाव (ता. पंढरपूर) येथील कृष्णा गंगथडे यांना वीरमरण आले. तर पाकिस्तानशी १९६५ मध्ये झालेल्या युद्धात महादेव वाघमारे (कारी, ता. बार्शी), नामदेव जगताप, संदीपान नाईकवाडे (माढा), जगन्नाथ चंदनशिवे (पंढरपूर), विठ्ठल गायकवाड (हलदहिवडी, ता. सांगोला), दादासाहेब घाडगे (मांजरी, ता. सांगोला) यांनी तर १९७१ च्या युद्धात लढताना अंबादास भांगे (माढा), प्रभाकर काटकर, नारायण गवळी (सोलापूर), दादा पडवळकर (मेडशिंगी, ता. सांगोला), रामचंद्र दोडकुळे (आलेगाव, ता. सांगोला) यांनी हौतात्म्य पत्करले.

तीन सैनिकांच्या शौर्य अन् वीरत्वाचा सन्मान

१९८७ मधील ‘ऑपरेशन पवन’मध्ये हौतात्म्य पत्करलेले प्रभाकर पात्रे (वागदरी, ता. अक्कलकोट) यांना वीरचक्र तर २००२ मधील ‘ऑपरेशन पराक्रम’मध्ये हौतात्‍म्य पत्करलेले परमानंद माने (शावळ, ता. अक्कलकोट) यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले. तर १९९९ मधील ‘ऑपरेशन रक्षक’मध्ये हौतात्म्य पत्करलेले कमाल काझी यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पेन्शनधारकांची आकडेवारी

  • निवृत्त सैनिक : ६,७४८

  • विधवा : २,७१५

  • युद्ध विधवा : ३४

  • एकूण : ९,४९७

सोलापूर जिल्ह्यातील १० हजार जण भारतीय सेनेत

सोलापूर जिल्ह्यातील १० हजार जण भारतीय सेनेत कार्यरत आहेत. दरवर्षी जिल्ह्यातून भरती झालेले ३०० ते ४०० जण निवृत्त होतात, तर तितकेच सैन्यात भरती होतात. देशाच्या सुरक्षेसाठी ४२ सैनिक व अधिकाऱ्यांनी हौतात्म्य पत्करले आहे. ३४ वीरपत्नी, सात वीर माता व एक वीरपिता अशा त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे. यंदा जिल्ह्यातून एक कोटी ७२ लाखांचा सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन झाला आहे.

- मेजर मिलिंद तुंगार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : स्वातंत्र्य दिनीच मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना घेतले ताब्यात

Latest Marathi News Live Updates : पालिका निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाचा कोंबडीसह आंदोलन

'तुमच्या डोक्यावर तरी केस आहेत का?' रजनीकांत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, थलैवाच्या वक्तव्यामुळे “बॉडी शेमिंग”चा मुद्दा पुन्हा चर्चेत

Independance Day Photos : 15 ऑगस्ट 1947 ला कसा साजरा झालेला भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन? 10 फोटो पाहून म्हणाल, हिंदुस्थान ज़िंदाबाद!

Maharashtra Government : जमीन मोजणीला मिळणार गती; भूमी अभिलेख विभागाला १२०० रोव्हर खरेदीस मान्यता

SCROLL FOR NEXT