10th-12th Exam 2023 dates released checked full schedule hsc ssc exam 2023 final dates  
महाराष्ट्र बातम्या

SSC-HSC Exam 2023 : विद्यार्थ्यानो लागा तयारीला! 10वी-12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 'येथे' पाहा तारखा

सकाळ डिजिटल टीम

SSC-HSC Exam 2023 Dates : दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आङे बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

यंदाची बारावीची लेखी परीक्षा ही २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा ही ०२ मार्च ते २५ मार्च या दरम्यान होईल.

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सप्टेंबर पासून उपलब्ध करून देण्यात आलेली असून, सदर वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आल्या होत्या.

दरम्यान संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून इयत्ता १२ वी व इयत्ता १० वी ची वेळापत्रके अंतिम करण्यात आलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT