Maharashtra Board Exam Result Sakal
महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावीचा निकाल ३० मेपूर्वी! विद्यार्थ्यांना डिप्लोमा, अभियांत्रिकी, डीएड, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंटमधून करिअरची मोठी संधी, वाचा सविस्तर...

दहावीच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा, आयटीआय तर बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, डीएड, फार्मसी, अशा व्यावसायिक कोर्समधून करिअरची मोठी संधी उपलब्ध आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : दहावी-बारावीची परीक्षा नुकतीच संपली असून २५ ते ३० मेपूर्वी त्यांचे निकाल जाहीर होतील. परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीवरून अनेक विद्यार्थी प्रवेश घ्यायचा कोठे, कोणता कोर्स-शाखा निवडायची हे फायनल करतात. पण, दहावीच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा, आयटीआय तर बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, डीएड, फार्मसी, अशा व्यावसायिक कोर्समधून करिअरची मोठी संधी उपलब्ध आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना नेमका प्रवेश घ्यायचा कोणत्या शाखेला तथा अभ्यासक्रमाला? यासंबंधीचा निर्णय दूरदृष्टीतून घ्यावा लागणार आहे.

पदवी, पदव्युत्तरपर्यंत नुसते शिक्षण घेऊन बेरोजगार राहिलेल्याचे प्रमाण आता खासगी उद्योग, व्यवसायांमुळे व बॅंकांच्या माध्यमातून मिळत असलेल्या अर्थसहाय्यामुळे, जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीमुळे कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. अनेकांनी सरकारी नोकरीची वाट न पाहता स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआय (वेल्डर, फिटर, प्लबिंग, रंगकाम अन्य), डिप्लोमाच्या माध्यमातून दोन ते तीन वर्षांतच रोजगार मिळतो. डिप्लोमानंतर त्या विद्यार्थ्यांना पुढे अभियांत्रिकीचा पर्याय देखील खुला आहे.

अनेकजण डी.एड. तथा मॉन्टेसरी टिचरचा कोर्स करून खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करीत आहेत. काहींनी खासगी कोचिंग क्लासेस सुरू केले आहेत. दहावी-बारावीनंतर अनेक विद्यार्थी ‘नीट’, ‘जेईई’ परीक्षांची तयारी करून पुढील शिक्षणाची वाट सुकर करत असल्याचे चित्र आहे.

महामार्गांच्या कनेक्टिव्हीटीमुळे ‘हॉटेल मॅनेजमेंट’मधून रोजगार

सोलापूर जिल्ह्यातून सध्या सोलापूर-पुणे, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-विजयपूर, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-मंगळवेढा (नागपूर-रत्नागिरी), सोलापूर-तुळजापूर असे महामार्ग झाले आहेत. याशिवाय सुरत-चेन्नईसारखे आणखी काही महामार्ग प्रस्तावित आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यातून गेलेल्या प्रत्येक महामार्गांलगत हॉटेल, व्यवसायांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यात मोठमोठे हॉटेल्स आहेत. विविध शहरांमध्ये देखील हॉटेल्स वाढत आहेत. त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंटमधून देखील विद्यार्थ्याना विशेषत: मुलींना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

फार्मसी, ‘एमबीए’मध्ये देखील संधी

‘एमबीए’मधील विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेल्यांना मार्केटिंगसह व्यवस्थापन, कार्यालयीन अधीक्षक अशा पदांवर नोकरीची संधी मिळत आहे. दुसरीकडे कोरोनानंतर लोक आरोग्याकडे आवर्जून लक्ष देत आहेत. त्यामुळे बी किंवा डी फार्मसी पूर्ण करून मोठमोठ्या औषधनिर्माण कंपन्यांमध्ये रोजगार मिळविता येतो. याशिवाय स्वतःचे मेडिकल सुद्धा सुरू करता येते. सोलापूर जिल्ह्यात पाच हजारांवर मेडिकल असून दरवर्षी अंदाजे तीन हजार कोटींची औषधांची विक्री होते, अशी स्थिती आहे. त्यामुळे तरुण-तरुणींना फार्मसीमधूनही करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

SCROLL FOR NEXT