महाराष्ट्र

कृषीपंपधारकांकडे 1103 कोटी थकबाकी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सध्या रब्बीची पेरणी सुरू आहे. मात्र वाढत्या भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात महावितरणची कृषीपंपधारकांकडे 1103.9 कोटी रुपये थकबाकी असल्याने वीज कंपनीला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. जवळपास एक लाख 24 हजार 281 कृषीपंपधारकांकडे वीजबील थकलेले आहे. ते त्वरीत भरावे असे आवाहन करण्यात आले. 

महावितरणच्या नांदेड जिल्ह्यात एक लाख 24 हजार 714 ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांकडे कोट्यावधीची थकबाकी असून महावितरणला चांगलाच फटका बसत आहे. थकबाकी वाढत असल्याने देखभाल व दुरूस्तीला लागणारा खर्च कमी पडत असल्याने तसेच वीजेची मागणी वाढत असून पुरवठा त्यानुसार होत नाही. रब्बीच्या पेरणीसाठी भारनियमनाला शेतकरी कंटाळले आहेत. निव्वळ एक लाख 24 हजार 291 कृषीपंप धारकांकडे 1103.9 कोटी रुपये थकबाकी आहे.

तरीसुध्दा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मागील दोन वर्षात दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून 117 रोहीत्र देण्यात आले. तीन वर्षात विशेष पॅकेजअंतर्गत 451 रोहीत्र उपलब्ध करून दिले. त्यासोबतच पाच हजार 856 नवीन कृषीपंपाना जोडण्या दिल्या. जिल्हा नियोजन समितीमार्फत पाच नोव्हेंबर रोजी तीन कोटी 51 लाख रुपये महावितरणला उपलब्ध झाले. त्यातून अनेक बंद व नादूरुस्त डीपी सुरू करण्यात येत आहेत. ता. 31 ऑक्टोबरपर्यंत बंद पडलेले तीन फेज रोहीत्र एक हजार 373 दुरूस्त करण्यात आले. दुरुस्त करून दिलेल्या रोहीत्रांची संख्या ही 981 असल्याचे महावितरणने सांगितले. कृषी पंपासह घरगुती व वाणिज्य वापराच्या वीज ग्राहकांकडे लाखोंची थकबाकी आहे. महावितरणची थकबाकी वसुल झाली तर नलवीन कामाना गती देता येईल असे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात डीपीला लागणारे ऑईल पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याने थोडा शेतकऱ्यांना मध्यंतरच्या काळात त्रास झाला. मात्र आता ऑईल उपलब्ध झाले असून युद्ध पातळीवर दुरूस्तीचे काम सुरू असून लवकरच बंद डीपी सुरू होतील असा विश्वास महावितरणचे नांदेड परिमंडळ जनसंपर्क अधिकारी धनंजय पवार यांनी व्यक्त केला. तसेच वीज ग्राहकांनी थकबाकी वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT