Unseasonal Rain  sakal
महाराष्ट्र बातम्या

1.12 लाख शेतकऱ्यांचा एकच प्रश्न, ‘पैसे अजूनही मिळाले नाहीत’! 75000 जणांची पडताळणी सुरू, 36000 जणांची राहिली ‘E-kyc’, कधी मिळणार भरपाई, वाचा...

प्रशासनाने पोर्टलवर अपलोड केलेल्या १ लाख १२ हजार ०८१ बाधित शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. पैसे का मिळाले नाहीत, याबाबत प्रशासनाकडून विविध कारणे सांगितली जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराला आता दोन महिने उलटले. दिवाळीही संपून देव-दिवाळीही झाली, तरी प्रशासनाने पोर्टलवर अपलोड केलेल्या १ लाख १२ हजार ०८१ बाधित शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. पैसे का मिळाले नाहीत, याबाबत प्रशासनाकडून विविध कारणे सांगितली जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. हीच समस्या सर्व बाधित शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

सप्टेंबर अखेरीस झालेली अतिवृष्टी व महापुरातील बाधितांना दिवाळीपूर्वी व दिवाळीमध्ये मदतीचे पैसे देण्यास सुरवात झाली. जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार ७८० शेतकऱ्यांना आतापर्यंत ५८४ कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. मदत वाटपाची प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल, अशीच अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात दोन महिन्यानंतरही जवळपास एक लाख शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

बाधित शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसणे, फार्मर आयडी काढला पण तहसीलदारांकडे प्रलंबित राहिला आहे, काही शेतकऱ्यांचे आधार डुप्लिकेशन झाले, ई-केवायसी राहिली, खाते नंबर चुकला, पंचनाम्यातील नाव वेगळे व फार्मर आयडीतील नाव वेगळे यासह अनेक कारणे कोतवाल, तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार सांगत आहेत. त्यामुळे बाधित शेतकरी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यातच मेटाकुटीला आला आहे.

आठ दिवसांत रक्कम शेतकऱ्यांना मिळेल

मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ७० हजार शेतकऱ्यांची आम्ही ई-केवायसी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांसाठी महसूल प्रशासनाने शिबिर सुरू केले आहेत. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही, त्यांनी या शिबिरामध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्यावी. त्यानंतर सात ते आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा होईल.

- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

आकडे बोलतात...

  • नावे अपलोड झालेले शेतकरी : ५ लाख ९२ हजार ८६१

  • नावे अपलोड झाल्याची रक्कम : ७२४ कोटी रुपये

  • भरपाई मिळालेले शेतकरी : ४ लाख ८० हजार ७८०

  • मिळालेली रक्कम : ५८४ कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chandrakant Patil : चंद्रकांत दादांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला; “तिजोरीची चावी दुसऱ्याकडे, पण तिजोरीचा मालक आमचाच”

Ladki Bahin Yojana: नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार? लाडक्या बहि‍णींना लागणार लॉटरी?

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर

'धनंजय मुंडेंसारखा विचित्र माणूस पृथ्वीतलावर नाही'; वाल्मीक कराडची आठवण काढणाऱ्या मुंडेंवर जरांगेंची सडकून टीका

Ethiopia Volcano Ash : मुंबई अन् दिल्लीपर्यंत पोहोचली इथोपियातील ज्वालामुखीची राख; अनेक विमानांची उड्डाणे रद्द, अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT